Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Corona Update : देशात कमी होतोय कोरोना..! पहा, 24 तासात किती सापडलेत नवे रुग्ण ?

दिल्ली : देशात कोरोना संसर्गाच्या घटनांमध्ये सातत्याने घट होत आहे. शनिवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासांत 920 नवीन रुग्ण आढळले असून 13 जणांचा मृत्यू झाला आहे. 1,388 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राष्ट्रीय राजधानीत कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 4,331 आहे. त्याच वेळी, गेल्या 24 तासांत उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचे 1,776 नवीन रुग्ण आढळले आणि 3,101 रुग्ण बरे झाले. या दरम्यान 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. उत्तर प्रदेशात कोरोनाचे 15,276 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Advertisement

मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 349 रुग्ण आढळले आहेत. तर 635 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज मुंबईत कोरोनाचा पॉजिटिविटी दर 0.88 टक्के आहे. कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण 2,925 आहेत. शहरात आतापर्यंत एकूण 10 लाख 31 हजार 304 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तामिळनाडूमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,812 नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 11,154 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला असून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 47 हजार 643 आहे.

Advertisement

शनिवारी सकाळी 8 वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 50,407 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि 804 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 492 मृत्यू एकट्या केरळमधील आहेत. आकडेवारीनुसार, आतापर्यंत सापडलेल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या 4.25 कोटींवर गेली आहे आणि 5 लाखांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. गेल्या एका दिवसात 87,359 अॅक्टिव्ह प्रकरणांमध्ये घट झाली आहे आणि त्यांची संख्या 6,10,443 वर आली आहे जी एकूण प्रकरणांच्या 1.43 टक्के आहे.

Loading...
Advertisement

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रुग्णांचा बरे होण्याचा दर 97.37 टक्क्यांवर गेला आहे आणि मृत्यू दर 1.19 टक्के राहिला आहे. दैनंदिन संसर्ग दर देखील कमी होत आहेत. सध्या, दैनिक संसर्ग दर 3.48 टक्के आहे आणि साप्ताहिक संसर्ग दर 5.07 टक्के आहे. देशात आतापर्यंत कोरोना लसीचे 172.71 कोटी डोस देण्यात आले आहेत.

Advertisement

कोरोनाचा धोका अजूनही आहे..! WHO ने लोकांना दिलाय ‘हा’ महत्वाचा इशारा; वाचा, महत्वाची माहिती..

Advertisement
Advertisement

Leave a Reply