Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. 44 टक्के अमेरिकी म्हणतात, ‘त्या’ संकटास बायडेन जबाबदार; पहा, कुणी केलाय ‘हा’ धक्कादायक खुलासा

दिल्ली : जगभरात कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. गेल्या आठवड्यात, कोरोना संसर्गाची 2 कोटींपेक्षा जास्त नवीन प्रकरणे नोंदली गेली होती. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन (WHO) कडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या सुरुवातीपासून साप्ताहिक पातळीवरील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. डब्ल्यूएचओने यावरही भर दिला आहे, की डेल्टा व्हेरियंटपेक्षा अधिक घातक ओमिक्रॉन प्रकार हळूहळू SARS-CoV-2 विषाणूचे प्रबळ प्रकार बनत आहे. अमेरिकेत तर कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहेत. जगात हा देश कोरोनाने अगदीच हैराण झाला आहे.

Advertisement

या संकटाने अमेरिकन लोक हैराण झाले आहेत. या संकटापुढे थकले आहेत. 77 टक्के लोकांचा असा विश्वास आहे, की बहुतेक लोक या घातक आजाराच्या विळख्यात सापडतील. कैसर फॅमिली फाऊंडेशन (KFF) च्या सर्वेक्षणाद्वारे ही माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणात 77 टक्के लोकांचे लसीकरण झाले असून 74 टक्के लोक लसीकरणाबाहेर आहेत.

Advertisement

सर्वेक्षणातील निम्म्याहून कमी सहभागी लोक COVID-19 परिस्थितीबद्दल आशावादी होते, परंतु 40 टक्के लोकांनी नाराजी व्यक्त केली. शुक्रवारी जाहीर झालेल्या सर्वेक्षणानुसार, 29 टक्के लोक या संकटाचा अनुभव त्रासदायक होता, असे म्हणतात. सुमारे 62 टक्के लोकांचा असा विश्वास आहे, की COVID-19 विरुद्ध लसीकरण साथीच्या रोगापासून संरक्षण करेल. लसीकरण केलेल्या लोकांना ओमिक्रॉन प्रकाराचा संसर्गाच्या बातम्या येत असतानाही ते या विश्वासावर ठाम आहेत.

Advertisement

सर्वेक्षण केलेल्या जवळजवळ अर्ध्या अमेरिकन नागरिकांनी देशाच्या अन्न आणि औषध प्रशासनाला COVID-19 चाचणीच्या मर्यादित उपलब्धतेसाठी जबाबदार धरले. तर 44 टक्के लोक म्हणाले, की राष्ट्राध्यक्ष जो बायडेन या संकटास जबाबदार आहेत. तपास यंत्रणांना दोषी ठरवणाऱ्यांची संख्या 41 टक्के असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. हे सर्वेक्षण 11 ते 23 जानेवारी दरम्यान फोनद्वारे करण्यात आले आणि त्यात 1,536 लोकांनी भाग घेतला.

Advertisement

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की पुढील कोरोना प्रकार ओमिक्रॉनपेक्षा जास्त संसर्गजन्य असेल. जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे, की पुढील कोरोना प्रकार ओमिक्रॉनपेक्षा अधिक संसर्गजन्य असेल परंतु भविष्यातील प्रकार कमी प्राणघातक असतील याची शाश्वती नाही.

Advertisement

बाब्बो.. कोरोनाबाबत पुन्हा आलाय धक्कादायक अहवाल..! ‘त्या’ देशात एक महिना आधीच कोरोनाने घेतली होती एन्ट्री..

Advertisement
Advertisement

Leave a Reply