Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Corona Update : केरळमुळे वाढलेय टेन्शन.. आज देशात सापडलेत ‘इतके’ कोरोना रुग्ण

दिल्ली : देशातील कोरोना संसर्गाची तिसरी लाट कमकुवत होताना दिसत आहे. कोविड-19 च्या दैनंदिन प्रकरणांमध्ये घट झाली आहे. तसेच या आजारातून बरे होण्याचा दर 93.89 टक्क्यांवर गेला आहे. गेल्या 24 तासांत अॅक्टिव्ह प्रकरणांमध्ये एक लाखांहून अधिक घट झाली आहे. मुंबई आणि दिल्लीमध्ये कोरोना रुग्णसंख्येमध्ये घट झाली आहे, परंतु दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये वाढता संसर्ग अजूनही काळजीत टाकणारा आहे.

Advertisement

गेल्या 24 तासांत मुंबईत कोरोनाचे 1,411 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 12,187 अॅक्टिव्ह प्रकरणे आहेत. त्याचवेळी दिल्लीत कोरोनाची प्रकरणे सातत्याने कमी होत आहेत. गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनाचे 4,483 रुग्ण आढळले असून 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत चालला आहे. गेल्या 24 तासांत केरळमध्ये कोरोना संसर्गाचे 50,812 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह राज्यातील रुग्णांची संख्या 59,31,945 वर पोहोचली आहे, तर साथीच्या आजाराने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 53,191 वर पोहोचली आहे.

Advertisement

तामिळनाडूमध्ये कोरोनाचे 24,418 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 46 लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 2,08,350 अॅक्टिव्ह प्रकरणे आहेत. शनिवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एका दिवसात कोरोना संसर्गाची 2,35,532 प्रकरणे नोंदली गेली आणि एकूण रुग्णांची संख्या 4,08,58,241 वर पोहोचली. गेल्या 24 तासात 871 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृत्यूंची संख्या 4,93,198 वर पोहोचली आहे.

Loading...
Advertisement

अॅक्टिव्ह प्रकरणे 20,04,333 पर्यंत कमी झाली आहेत. दैनिक पॉजिटिविटी दर 13.39 टक्के नोंदला गेला, तर साप्ताहिक पॉजिटिविटी दर 16.89 टक्के नोंदला गेला. मंत्रालयाने सांगितले की, गेल्या 24 तासांत 3,35,939 लोक बरे झाले असून, बरे झालेल्या लोकांची संख्या 3,83,60,710 झाली आहे. मृत्यू दर 1.21 टक्के नोंदला गेला.

Advertisement

दरम्यान, देशात आतापर्यंत 165.04 कोटी कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 56,72,766 लसीचे डोस देण्यात आले. मंत्रालयानुसार, 24 तासांत कोरोनाच्या 17,59,434 चाचण्या करण्यात आल्या.

Advertisement

बाब्बो.. कोरोनाबाबत पुन्हा आलाय धक्कादायक अहवाल..! ‘त्या’ देशात एक महिना आधीच कोरोनाने घेतली होती एन्ट्री..

Advertisement
Advertisement

Leave a Reply