आता आपले ‘वर्क फ्रॉम होम’च बरे..! ‘इतके’ टक्के कर्मचाऱ्यांना ऑफिस कल्चर नको.. आलाय ‘हा’ नवा अहवाल
दिल्ली : कोरोनाच्या संकटाने जगभरात अनेक बदल घडवून आणले आहेत. आता लोक ऑफिसला जाण्याऐवजी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देत आहेत. कोरोनाचे संकट अजून कायम असल्याने कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लाखो कर्मचारी घरुन काम करत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळीही अशीच परिस्थिती होती.
रोजगाराशी संबंधित वेबसाइट सायकीच्या ‘टेक टॅलेंट आउटलुक’ अहवालानुसार, कोरोनामुळे सुरुवातीला कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगण्यात आले. या नव्या पद्धतीच्या कामकाजात सुरुवातीस कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी आल्या. परंतु, आता दोन वर्षानंतर आता हा ‘नवा ट्रेंड’ बनला आहे. आणि नवीन सवयींनी लोकांच्या आयुष्यात जागा निर्माण केली आहे. या अभ्यासातील लोकांपैकी 82 टक्के लोकांना ऑफिसला जायचे नाही आणि घरून काम करायचे आहे. टॅलेंट टेक आउटलुक 2022 चार महाद्वीपातील 100 हून अधिक अधिकारी आणि मानव संसाधन अधिकारी यांच्याकडून मिळालेल्या प्रतिसादांचे विश्लेषण केले आहे. सोशल मीडिया, मुलाखती आणि पॅनल डिस्कशनच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आले.
अभ्यासात सहभागी असलेल्या 64 टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की, घरून काम केल्याने कामकाजात जास्त प्रमाणात होते. उत्पादकता वाढते आणि तणाव कमी होतो. दरम्यान, 80 टक्क्यांहून अधिक एचआर व्यवस्थापकांनी सांगितले की त्यांच्यासाठी पूर्णवेळ कार्यालयात जाणारे कर्मचारी शोधणे कठीण होत आहे. त्याच वेळी, 67 टक्क्यांहून अधिक कंपन्यांनी असेही म्हटले, की त्यांना ऑफिसमध्ये काम करणारे लोक शोधणे कठीण होत आहे.
बदललेल्या वातावरणात, घरून काम करणे हा पर्याय न राहता नवीन ट्रेंड बनला आहे आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाही त्यांच्या कंपन्यांकडून हे धोरण अपेक्षित आहे. जे कुणी कंपन्या या धोरणाचा स्वीकार करण्यास तयार नाहीत त्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवण्यात अनेक अडचणी येत आहेत. सायकीचे संस्थापक आणि सीईओ करुणजित कुमार धीर म्हणाले, की दोन वर्षांपासून या पद्धतीने कामकाज सुरू असल्याने एक नवीन ट्रेंड मिळाला आहे. जो कंपनी आणि कर्मचारी या दोघांसाठीही फायदेशीर ठरणारा आहे.
ओमिक्रॉनची भीती : इतके टक्के कर्मचारी म्हणतात आपले ‘वर्क फ्रॉम होम’च बरे