वाव.. रेल्वेच्या ‘त्या’ दवाखान्यांनी केलीय मोठी कामगिरी; कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्यांनाही मिळालाय दिलासा.. जाणून घ्या..
दिल्ली : देशभरातील भारतीय रेल्वेची एकूण 695 रुग्णालये आणि आरोग्य केंद्रे ‘आयुष्मान भारत डिजिटल मिशन’ (ABDM) मध्ये यशस्वीपणे जोडली गेली आहेत. भारतीय रेल्वेचे 80 लाख कर्मचारी, पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबीयांना या निर्णयाचा फायदा झाला असल्याची माहिती शनिवारी देण्यात आली. याबरोबरच रेल्वे रुग्णालयातील सुविधांचा लाभ घेण्याची संधीही सर्वसामान्यांना मिळणार आहे.
शनिवारी प्रसिध्दी पत्रकाद्वारे सांगण्यात आले की, रेल्वे रूग्णालयातील कोणताही रूग्ण एबीडीएमशी संलग्न असलेल्या अन्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाला तरी एकात्मिक प्रणालीच्या मदतीने वैद्यकीय नोंदी डिजिटल स्वरूपात सहजपणे देवाणघेवाण करता येतात. ही एक जलद, सोपी आणि अखंड प्रक्रिया आहे. त्याच बरोबर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही नाहक त्रास सहन करावा लागणार नाही.
रेल्वे आरोग्य यंत्रणा आयुष्मान भारत डिजिटल मिशन बरोबर जोडण्याचे काम RailTel Corporation of India ने केले आहे. हा एक केंद्र सरकारचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे जो रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत आहे. माहितीनुसार, राष्ट्रीय डिजिटल हेल्थ इकोसिस्टम तयार करण्यासाठी ‘आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM)’ ची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार असलेली संस्था राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) च्या सहकार्याने हे साध्य करण्यात आले आहे.
पुनीत चावला, CMD, RailTel यांच्या मते, देशभरातील सर्व 695 रेल्वे रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमधील ‘हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम (HMIS)’ रेल्वे आरोग्य व्यवस्थेसाठी चांगले असल्याचे सिद्ध झाले आहे. आता, रेल्वे HMIS आणि ABDM च्या एकत्रीकरणामुळे लाभार्थ्यांना ABM इकोसिस्टमचे फायदे डिजिटल पद्धतीने मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.