Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाचा धोका वाढला..! ‘या’ राज्यात ‘इतके’ दिवस शाळा-कॉलेज राहणार बंद; जाणून घ्या, डिटेल..

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता गृह विभागाने शाळा बंदच्या निर्णयात महत्वाचा बदल केला आहे. या निर्णयानुसार, आता राज्यातील शाळा आणि महाविद्यालये 6 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये 6 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. मात्र, या कालावधीत ऑनलाइन वर्ग सुरू राहणार आहेत. याआधी सरकारने ३० जानेवारीपर्यंत शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. आता आदेशात सुधारणा करुन शाळा बंद ठेवण्याच्या कालावधीत आणखी वाढ करण्यात आली आहे.

Advertisement

उत्तर प्रदेशमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने सरकारने सर्व शैक्षणिक संस्था 6 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश कुमार अवस्थी यांनी शुक्रवारी याबाबत आदेश जारी केला आहे. कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर 5 जानेवारी रोजी शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते.

Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून सरकारने 16 जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश जारी केले होते. कोविडचा प्रादुर्भाव कायम असल्याने 23 जानेवारीपर्यंत पुन्हा शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर सरकारने शाळा बंद ठेवण्याची मुदत ३० जानेवारीपर्यंत वाढ केली होती. आता पुन्हा सर्व शाळा, महाविद्यालये 6 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Loading...
Advertisement

राज्यात गेल्या 24 तासांत 7907 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी 14,993 रुग्ण बरे झाले आहेत. नवीन रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण बरे होत असल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 65,263 वर आली आहे. 17 जानेवारी रोजी, तिसऱ्या लाटेत राज्यात सर्वाधिक 1.06 लाख अॅक्टिव्ह रुग्ण होते. म्हणजेच 11 दिवसांत 41,353 रुग्ण कमी झाले आहेत. दुसरीकडे, कोरोना संसर्गामुळे 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता राज्यातील संसर्ग दर 4.3 टक्क्यांवर आला आहे.

Advertisement

कोरोनाचा धोका वाढला..! ‘या’ राज्यात एक दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊन घोषित; पहा, काय आहे परिस्थिती

Advertisement
Advertisement

Leave a Reply