Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. अमेरिकेनंतर आता ‘या’ देशात कोरोनाचे थैमान; फक्त एकाच दिवसात सापडलेत ‘इतके’ रुग्ण

दिल्ली : जगभरात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. ब्राजीलमध्येही कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. ब्राजीलमध्ये गेल्या 24 तासांत कोरोना बाधितांची संख्या तब्बल 2,28,954 इतकी नोंदली गेली आहे. आता एकूण प्रकरणे 24.7 दशलक्षाहून अधिक झाली आहेत. ब्राजीलच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत 672 मृत्यूची नोंद झाली असून, हा आकडा 625,000 हून अधिक झाला आहे. इतर अनेक देशांप्रमाणेच ब्राजील सध्या कोरोनाच्या नवीन प्रकार ओमिक्रॉनच्या नवीन लाटेचा सामना करत आहे.

Advertisement

जगभरात कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. गेल्या आठवड्यात, कोरोना संसर्गाची 2 कोटींपेक्षा जास्त नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन (WHO) कडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या सुरुवातीपासून साप्ताहिक पातळीवरील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. डब्ल्यूएचओने यावरही भर दिला आहे, की डेल्टा व्हेरियंटपेक्षा अधिक घातक ओमिक्रॉन प्रकार हळूहळू SARS-CoV-2 विषाणूचे प्रबळ प्रकार बनत आहे. अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मृत्यूंचा आकडा सातत्याने वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसांत मृत्यूंचा आकडा आणखी वाढू शकतो.

Advertisement

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की पुढील कोरोना प्रकार ओमिक्रॉनपेक्षा जास्त संसर्गजन्य असेल. जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे, की पुढील कोरोना प्रकार ओमिक्रॉनपेक्षा अधिक संसर्गजन्य असेल परंतु भविष्यातील प्रकार कमी प्राणघातक असतील याची शाश्वती नाही.

Loading...
Advertisement

मागील दोन वर्षांपासून कोरोनाने जगभरात थैमान घालत आहे. हा घातक आजार संपणार तरी कधी, असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. त्यात आता जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी कोरोनाबाबत महत्वाची माहिती काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यांनी म्हटले होते, की जर जागतिक समुदायाने व्यापक उपाययोजना केल्या तर 2022 मध्ये कोरोना आजार संपुष्टात येऊ शकतो. टेड्रोस म्हणाले की WHO राष्ट्रीय, प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर पुरावे, धोरण, उपकरणे आणि तंत्रज्ञानासह काम करत आहे.

Advertisement

डब्ल्यूएचओ प्रमुख म्हणाले, की जर देशांनी या सर्व रणनीती आणि साधनांचा सर्वसमावेशक वापर केला तर आपण या वर्षी कोरोनाच्या कठीण परिस्थितीवर मात करू शकू. WHO कार्यकारी मंडळाच्या 150 व्या सत्राच्या उद्घाटनप्रसंगी टेड्रोस म्हणाले की, अशा आपत्कालीन परिस्थितींना रोखण्यासाठी साथीच्या रोगापासून धडे घेण्याची आणि नवीन उपाय विकसित करण्याची गरज आहे. यासाठी आपण आजार संपेपर्यंत थांबू नये, असे त्यांनी सांगितले. सध्याची परिस्थिती पाहता कोरोनाचे आणखीही काही व्हेरिएंट निर्माण होण्याचीही शक्यता त्यांनी व्यक्त केली.

Advertisement

पाकिस्तानही कोरोनाने हैराण..! वर्षभरानंतर देशात प्रथमच घडलेय ‘असे’ काही; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply