Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कोरोना निर्बंधांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय.. राज्यांना पाठवलेल्या पत्रात केलाय खुलासा; जाणून घ्या..

देशातीला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. रोगाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश जारी करण्यास सांगितले आहे. गृह सचिवांनी पत्रात म्हटले आहे की, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सर्व खबरदारी घेतली पाहिजे आणि हताश होऊ नये. तसेच कोरोना निर्बंधांबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. निर्बंधात 28 फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

Advertisement

गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशातील 407 जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण अजूनही 10 टक्क्यांहून अधिक आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय गृहसचिवांनी सांगितले की, कोरोनाची अॅक्टिव्ह प्रकरणे 22 लाखांहून अधिक आहेत. बहुतेक रूग्ण वेगाने बरे होत आहेत आणि रूग्णालयांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या कमी आहे पण तरीही ही काळजीची बाब आहे.

Advertisement

ते राज्यांना म्हणाले, की सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सर्व खबरदारी घेतली पाहिजे आणि सुरक्षा धोक्यात येऊ देऊ नये. 21 डिसेंबर रोजी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मानकांच्या आधारावर आणि परिस्थितीचे मूल्यांकन करून, स्थानिक, जिल्हा प्रशासनाने तत्पर आणि योग्य प्रतिबंधात्मक उपाय करणे सुरू ठेवावे. ते म्हणाले, की चाचणी-ट्रॅक-उपचार-लसीकरण आणि COVID योग्य वर्तनाचे पालन यावर सतत लक्ष केंद्रित केले पाहिजे. राज्य अंमलबजावणी यंत्रणेने कोविड प्रतिबंधात्मक नियम काटेकोरपणे लागू केले पाहिजेत.

Loading...
Advertisement

दरम्यान, गेल्या आठवड्यात जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाची तब्बल 2.1 कोटींपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या सुरुवातीपासून साप्ताहिक पातळीवरील हा सर्वाधिक आकडा आहे. जागतिकआरोग्य संघटनेने ही माहिती दिली. जागतिक आरोग्य संस्थेने देखील यावर जोर दिला आहे, की ओमिक्रॉन व्हेरिएंट हळूहळू SARS-CoV-2 विषाणूचा प्रबळ प्रकार बनत आहे कारण डेल्टा प्रकारापेक्षा हा व्हेरिएंट जास्त संक्रामक असल्याचे सिद्ध झाले आहे.

Advertisement

Corona Update : कोरोनावर मात करण्यासाठी ‘त्या’ 5 गोष्टी महत्वाच्या; केंद्राने राज्यांना पाठवलेय पत्र

Advertisement
Advertisement

Leave a Reply