Corona Update : कोरोनावर मात करण्यासाठी ‘त्या’ 5 गोष्टी महत्वाच्या; केंद्राने राज्यांना पाठवलेय पत्र
नवी दिल्ली : देशातीला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. रोगाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश जारी करण्यास सांगितले आहे. गृह सचिवांनी पत्रात म्हटले आहे की, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सर्व खबरदारी घेतली पाहिजे आणि हताश होऊ नये.
ते म्हणाले, की ओमिक्रॉन या नवीन प्रकारामुळे सध्याची कोविड लाट वेगवान होत आहे आणि देशात कोविड रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे आणि अॅक्टिव्ह प्रकरणे 22 लाखांहून अधिक झाली आहेत. 34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 407 जिल्हे 10 टक्क्यांपेक्षा जास्त संसर्ग दर नोंदवत आहेत. त्यामुळे कोविड विषाणूचा सध्याचा ट्रेंड पाहता सावधगिरी बाळगण्याची आणि दक्षता घेण्याची गरज आहे.
ते राज्यांना म्हणाले, की सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सर्व खबरदारी घेतली पाहिजे आणि सुरक्षा धोक्यात येऊ देऊ नये. 21 डिसेंबर रोजी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मानकांच्या आधारावर आणि परिस्थितीचे मूल्यांकन करून, स्थानिक, जिल्हा प्रशासनाने तत्पर आणि योग्य प्रतिबंधात्मक उपाय करणे सुरू ठेवावे. ते म्हणाले, की चाचणी-ट्रॅक-उपचार-लसीकरण आणि COVID योग्य वर्तनाचे पालन यावर सतत लक्ष केंद्रित केले पाहिजे. राज्य अंमलबजावणी यंत्रणेने कोविड प्रतिबंधात्मक नियम काटेकोरपणे लागू केले पाहिजेत.
दरम्यान, गेल्या आठवड्यात जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाची तब्बल 2.1 कोटींपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या सुरुवातीपासून साप्ताहिक पातळीवरील हा सर्वाधिक आकडा आहे. जागतिकआरोग्य संघटनेने ही माहिती दिली. जागतिक आरोग्य संस्थेने देखील यावर जोर दिला आहे, की ओमिक्रॉन व्हेरिएंट हळूहळू SARS-CoV-2 विषाणूचा प्रबळ प्रकार बनत आहे कारण डेल्टा प्रकारापेक्षा हा व्हेरिएंट जास्त संक्रामक असल्याचे सिद्ध झाले आहे.