दिल्ली : देशातील विविध शहरांमध्ये वायू प्रदूषणाची समस्या गंभीर बनत चालली आहे. एका नवीन अहवालानुसार, बेंगळुरूमधील सर्व 10 वायु गुणवत्ता निरीक्षण केंद्रांद्वारे नोंदवलेल्या प्रदूषणाची पातळी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मानकांपेक्षा जास्त आहे. ग्रीनपीसने दक्षिण भारतीय शहरातील वायू प्रदूषणाबाबत एक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार बंगळुरू आणि इतर दक्षिण भारतीय शहरांमधील परिस्थिती चिंताजनक आहे. वायू प्रदूषणामुळे येथे सुमारे 12,000 मृत्यू झाल्याचे मानले जाते.
अहवालानुसार, PM 2.5 आणि PM 10 ची वार्षिक सरासरी मूल्यांवरुन लक्षात येते, की सर्व ठिकाणी प्रदूषणाची पातळी WHO मानकांपेक्षा जास्त आहे. या व्यतिरिक्त, सर्व स्टेशन्सची PM 2.5 व्हॅल्यू NAAQS नियमांत आहेत आणि 8 स्टेशन्सची PM 10 व्हॅल्यू जास्त आहेत. हा अहवाल अशा वेळी आला आहे जेव्हा शहरातील बहुतेक लोक सार्वजनिक वाहतूक कमी वापरत आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लोक खासगी वाहनांचा अवलंब करत आहेत.
अहवालात म्हटले आहे की, भारतातील देशभरातील शहरांत प्रदूषण वाढले आहे. वायू प्रदूषण फक्त उत्तर भारतीय शहरांपुरते मर्यादित नाही. ग्रीनपीसच्या अहवालाने यावर जोर दिला आहे की 80 टक्क्यांपेक्षा जास्त शहरांमधील PM10 पातळी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आहे. बेंगळुरूमध्ये सुमारे 10 दशलक्ष वाहने आहेत, जे सुमारे 800 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापतात. खराब रस्ते, खराब नियोजन आणि खासगी वाहनांचा वापर यामुळे आधी देशाचे “गार्डन सिटी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरूमधील जीवनमानात तीव्र घसरण झाली आहे.
टॉमटॉम इंडेक्सच्या अहवालानुसार, शहरातील वाहतूक इतकी मंद आहे की ज्यामुळे बेंगळुरूला जगातील सर्वात वाईट वाहतूक असलेले शहर म्हणून घोषित करण्यात आले होते. टॉमटॉम हे नेव्हिगेशन, रहदारी आणि नकाशा उत्पादनांचे जागतिक पुरवठादार आहे. वार्षिक ट्रॅफिक इंडेक्सनुसार, देशाचे स्टार्टअप हब बेंगळुरूने 57 देशांमधील 415 इतर शहरांना मागे टाकत या यादीत आघाडीचा क्रमांक मिळवला आहे.
बाब्बो.. दिल्ली नाही तर हे शहर ठरलयं सर्वात प्रदूषित; पहा, कसे वाढलेय प्रदूषण..?