Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

राज्य सरकारचा मोठा निर्णय..! राज्यात ‘या’ दिवसापासून पुन्हा सुरू होणार शाळा; जाणून घ्या, अपडेट

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील शाळा 15 फेब्रुवारपर्यंत ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, आता कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाही पुन्हा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, आता 24 जानेवारीपासून इयत्ता पहिली ते 12 वीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत.

Advertisement

राज्यात कोरोनाचा प्रसार वाढल्यानंतर शाळा 15 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय याआधी घेतला होता. त्यानंतर महाविद्यालये देखील बंद करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. आता मात्र या निर्णयात बदल करण्यात आला आहे. आता शाळा 24 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार आहेत. मात्र, स्थानिक प्रशासनाला त्याचे अधिकार दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता सोमवारुपासून पुन्हा शाळा सुरू होणार आहेत.

Advertisement

राज्यातील शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांना दिला होता. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही शाळा पुन्हा सुरू होणार असल्याचे संकेत बुधवारी दिले होते. मंत्री ठाकरे यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर आज राज्य सरकारने शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भात महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. शाळां बरोबरच महाविद्यालये सुरू करण्यासाठी कॅबिनेटमध्ये आज निर्णय होणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला जाईल, असे उदय सामंत म्हणाले.

Advertisement

कोरोना विषाणू संसर्ग अद्यापही सुरू आहे. कोरोना संसर्ग संपलेला नाही त्यामुळे निर्बंध आणि नियम लागू करुनच महाविद्यालय सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. राज्यातील पहिली ते बारावीचे वर्ग सोमवारी 24 जानेवारीला कोरोना नियमावलीचे पालन करुन सुरु होत आहेत. आजच्या कॅबिनेट बैठकीत कॉलेज सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्री काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

कोरोनाचा धोका वाढलाय..! राज्यात ‘या’ शहरातील शाळा बंद करण्याचा निर्णय; जाणून घ्या माहिती

Advertisement
Advertisement

Leave a Reply