Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. वाढले की टेंशन; पहा किती लाखांवर गेली रुग्णसंख्या, महाराष्ट्र टॉपवर

मुंबई : भारतात कोरोनाची तिसरी लाट सुरूच आहे. कधी कोरोना संसर्गाचा वेग वाढताना दिसत आहे तर कधी कमी होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या रविवारच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत दोन लाख ७१ हजार २०२ रुग्ण आढळले आहेत, जे शनिवारच्या तुलनेत 2,369 ने अधिक आहेत. त्याचवेळी, गेल्या 24 तासात कोरोनामुळे 314 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या  देशात सक्रिय प्रकरणांच्या संख्येने 15 लाख (15,50,377) हा टप्पा ओलांडला आहे. यादरम्यान एक लाख 38 हजार 331 लोक बरे झाले. देशातील दैनिक पोझीटिव्ह दर आता 13.11 टक्के आहे. देशातील लोकांचे बरे होण्याचे प्रमाण 95.59 टक्के आहे. देशव्यापी लसीकरणांतर्गत आतापर्यंत 156 कोटी लसी देण्यात आल्या आहेत. देशातील कोरोना संसर्गाचा दर 16.28 टक्क्यांवर गेला आहे. शनिवारी, जेथे सकारात्मकता दर 16.66 टक्के नोंदवला गेला. साप्ताहिक संसर्ग दर 13.69% आहे. आतापर्यंत 70.24 कोटी कोरोना चाचण्या झाल्या आहेत. गेल्या 24 तासात 16,65,404 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

Advertisement

कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकाराची प्रकरणेही सातत्याने वाढत आहेत. देशात आतापर्यंत Omicron चे एकूण 7,743 रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासात ओमिक्रॉन प्रकरणांमध्ये 28.17 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात सर्वाधिक 42,462 रुग्ण आढळले आहेत आणि त्यानंतर कर्नाटकात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 32,793 नवीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर तामिळनाडूमध्ये 23,989 रुग्ण आढळले आहेत. बंगाल 22,645 प्रकरणांसह चौथ्या स्थानावर आहे. त्याच वेळी दिल्ली 20,718 रुग्णांसह पाचव्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेशातही 16000 हून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. बिहारमध्ये कोरोनाचे ६ हजार 325 रुग्ण आढळले आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply