Take a fresh look at your lifestyle.

Corona Update : देशात आजही 2 लाखांपेक्षा जास्त रुग्ण; पहा, काय आहे राज्यांतील परिस्थिती ?

मुंबई : शनिवारीही देशात 2 लाखांहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी रात्री 9 वाजेपर्यंत 2 लाख 3 हजार 689 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत 81,512 लोक बरे झाले आहेत. देशातील एकूण अॅक्टिव्ह प्रकरणे म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही 15 लाखांहून अधिक झाली आहे. सध्या देशात 15.33 लाख अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Advertisement

देशात आतापर्यंत 3.70 कोटी लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले असून त्यापैकी 3.50 कोटी लोक बरे झाले आहेत. मुंबईत नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे. शनिवारी देखील गेल्या 24 तासांत 10,661 नवीन रुग्णांची नोंद झाली. शुक्रवारी मेट्रो सिटीमध्ये 11,317 आणि गुरुवारी 13,702 नवीन रुग्ण आढळले होते. सध्या मुंबईतील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 73,518 वर गेली आहे.

Advertisement

शनिवारी दिल्लीत कोरोनाचे 20,718 रुग्ण आढळले. 13 जानेवारी रोजी 28,867 प्रकरणे नोंदवली गेली, जी आतापर्यंत दिल्लीत आढळलेली एक दिवसीय सर्वाधिक संख्या होती. त्यानंतर 14 जानेवारीला 24,383 रुग्ण आढळून आले आणि आज म्हणजेच 15 जानेवारीला रुग्ण आणखी कमी झाले. तथापि, राज्यातील पॉजिटिविटी दर 30.64 टक्के आहे. अॅक्टिव्ह प्रकरणे 93,407 आहेत. दिल्लीचे आरोग्य मंत्री सतेंद्र जैन यांनी शनिवारी सांगितले की, गेल्या 5-6 दिवसांत रूग्णांच्या रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढलेले नाही. यावरून येत्या काही दिवसांत रुग्णही कमी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement

आसाममध्ये एकाच दिवसात नवीन कोरोना रुग्णांची संख्या 44 टक्क्यांनी वाढली आहे. शनिवारी, राज्यात 3390 लोक कोरोना संक्रमित आढळले, तर पॉजिटिविटी दर देखील सुमारे 10 टक्क्यांनी वाढला. केरळमध्ये 17,755 नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यात आता एकूण 90,649 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पश्चिम बंगालमध्ये 19,064 कोरोना बाधित आढळले आहेत, जे शुक्रवारच्या तुलनेत 3,581 कमी आहेत.

Advertisement

देशात ओमिक्रॉनचे आतापर्यंत 6 हजार 41 रुग्ण आढळले आहेत. तसेच 16.66 टक्के इतका पॉजिटिविटी दर राहिला आहे.

Advertisement

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 43,211 नवे रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 33,356 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 2.61 लाख झाली आहे. राज्यात आतापर्यंत 71.24 लाख लोक संसर्गाच्या विळख्यात आले आहेत. त्यापैकी 67.17 लाख लोक बरे झाले आहेत. राज्यातील पॉजिटिविटी दर 21 टक्के आहे.

Advertisement

कोरोना तिथेही देणार त्रास..! नव्या अहवालात केलाय धक्कादायक खुलासा; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply