Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायकच आहे की..! लस मिळत असतानाही ‘त्या’ देशांना नकोय लस; कोट्यावधी लस परत पाठवल्या; पहा, काय आहे कारण

दिल्ली : जगात काही देश असेही आहेत की ज्यांना अजूनही कोरोना प्रतिबंधक लसी मिळालेल्या नाहीत. आणि काही देशात तर या लसींचे प्रचंड नुकसान होत आहे. आफ्रिकेतील बहुतांश देशांना लसी मिळालेल्या नाहीत. काही देशांना मिळाल्या पण त्या खूप कमी संख्येने. तर काही देशांना लसी मिळत असतानाही त्यांनी या लसी घेण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे, या देशातील बहुतांश लोकांचे लसीकरण झालेले नाही. मग, असे काय कारण आहे, की कोरोना प्रतिबंधक लसी मिळत असतानाही या देशांनी लसी घेण्यास नकार दिला आहे. या प्रश्नाचे उत्तर युनिसेफने दिले आहे.

Advertisement

युनिसेफने सांगितले, की जगात 30 पेक्षा जास्त देश असे आहेत की जे कोरोना लसी परत करत आहेत. मागील महिन्यात जगातील गरीब देशांनी दहा कोटींपेक्षा जास्त लसी घेण्यास नकार दिला. जगातील लहान आणि गरीब देशांना कोरोना प्रतिबंधक लसी देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने एक अभियान सुरू केले आहे. या अभियानाचे नाव ‘COVAX’ आहे. या अभियानांतर्गत लहान आणि गरीब देशांना मोफत लसी देण्यात येत आहेत. या अभियानांतर्गत 150 देशांना कोरोना लसी दिल्या जात आहेत.

Advertisement

मात्र, यातील काही देश आता लस घेण्यास तयार नाहीत. न्यूज एजन्सीनुसार, युनिसेफचे पुरवठा विभागाचे निदेशक एत्लेवा कैडिली यांनी सांगितले, की गरीब देशांनी डिसेंबर महिन्यात 10 कोटींपेक्षा जास्त लसी माघारी पाठवल्या आहेत. लसींसाठी शेल्फ लाइन कमी असल्याने या देशांनी लसी माघारी पाठवल्या आहेत. या देशांकडे लस साठवणूक करण्यासाठी फ्रीज सुद्धा नाहीत. त्यामुळे या देशांना लस साठवणूक करणे शक्य नाही. आतापर्यंत किती लसी परत पाठवल्या आहेत, याबाबत मात्र त्यांनी माहिती दिली नाही.

Advertisement

लस परत करण्याची ही बाब अशा वेळी समोर आली आहे जेव्हा कोरोनाचा एक नवीन प्रकार ओमिक्रॉनमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. लसीकरणाचा पुरवठा आणि वापर यावर लक्ष ठेवणाऱ्या एजन्सी CARE च्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत जितक्या लसी दिल्या गेल्या आहेत त्यामध्ये 90 देशांनी 68 कोटी डोस वापरले आहेत. काँगो आणि नायजेरिया सारख्या 30 हून अधिक देशांनी आतापर्यंत अर्ध्याहून कमी लसीकरण केले आहे.

Advertisement

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, जगातील श्रीमंत देशांतील 67 टक्के लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे, तर गरीब देशातील फक्त 8 टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे. युनिसेफनुसार, युरोपियन युनियनच्या देशांनी दिलेल्या लसींपैकी 1.5 कोटी लसी परत पाठवल्या गेल्या आहेत. यामध्ये एक तृतीयांश लसी एस्ट्राजैनेकाच्या होत्या, ज्यांची शेल्फ लाइफ फक्त 10 आठवड्यांची होती. श्रीमंत देश कमी शेल्फ लाइफ असलेल्या लसी देत आहेत. त्यामुळेही लस साठवणूक आणि वापरात गरीब देशांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Advertisement

बाब्बो.. म्हणून ‘तिथे’ तब्बल 10 लाख कोरोना लसी गेल्या वाया; पहा, कुठे घडलाय ‘हा’ धक्कादायक प्रकार

Advertisement
Advertisement

Leave a Reply