Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

देशात कोरोना सुस्साट..! आज देशभरात सापडलेत ‘इतके’ नवीन रुग्ण; ओमिक्रॉनचेही रुग्ण वाढले; जाणून घ्या, अपडेट

नवी दिल्ली : देशात मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 2,47,417 नवीन रुग्ण आढळले आहेत. 236 दिवसांनंतर इतक्या मोठ्या संख्येने नवीन प्रकरणे समोर आली आहेत. या प्रकरणांमध्ये ओमिक्रॉनच्या 5,488 प्रकरणांचा समावेश आहे. त्याच वेळी, अॅक्टिव्ह प्रकरणांची संख्या 11,17,531 पर्यंत वाढली आहे. अनेक राज्यांमध्ये संसर्गाचा वेग अतिशय जास्त आहे. महाराष्ट्र आणि राष्ट्रीय राजधानी दिल्ली शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.

Advertisement

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 46,406 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्याच वेळी पश्चिम बंगालमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 23,467 नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत कोरोनाचा वेग थोडा कमी झाला आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत कोरोनाचे 13,702 नवीन रुग्ण आढळून आले. दिल्लीत 24 तासांत कोरोना संसर्गाचे 28,867 नवीन रुग्ण आढळले. राष्ट्रीय राजधानीत 94,160 अॅक्टिव्ह प्रकरणे आहेत. त्याच वेळी गोव्यात कोरोनाचे 3,728 नवीन रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडूमध्ये कोरोना संसर्गाची 20,911 नवीन प्रकरणे नोंदली गेली. आंध्र प्रदेशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4348 नवीन रुग्ण आढळले आहेत.

Advertisement

देशात ओमिक्रॉन प्रकारातील 620 रुग्ण सापडले आहेत. अशा प्रकरणांची एकूण संख्या 5,488 वर गेली आहे, त्यापैकी 2,162 लोक आतापर्यंत बरे झाले आहेत किंवा परदेशात गेले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या सर्वाधिक 1,367 रुग्णांची नोंद झाली आहे. यानंतर राजस्थानमध्ये 792, दिल्लीत 549, केरळमध्ये 486 रुग्ण आढळले आहेत.

Loading...
Advertisement

3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून या वयोगटातील 3 कोटींपेक्षी अधिक किशोरांना पहिला डोस मिळाला आहे. कोविन पोर्टलनुसार, आतापर्यंत एकूण 3,06,60,329 किशोरवयीन मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे आणि दर मिनिटाला ही संख्या वाढत आहे. या वयोगटातील एकूण 3,21,63,781 तरुणांनी आतापर्यंत लसींसाठी नोंदणी केली आहे. 15-18 वयोगटातील तीन कोटींहून अधिक तरुणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. सर्व पात्र तरुण लाभार्थ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

Advertisement

Corona Update : देशात आज सापडलेत ‘इतके’ कोरोना रुग्ण; जाणून घ्या, देशातील कोरोनाची परिस्थिती

Advertisement
Advertisement

Leave a Reply