Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Corona Update : आज राजधानी दिल्लीत रेकॉर्ड ब्रेक रुग्ण; आरोग्य विभागाचे टेन्शन वाढले

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली शहरात आज कोरोनाचे रेकॉर्ड ब्रेक रुग्ण सापडले आहेत. गुरुवारी 28 हजार 867 नवे रुग्ण आढळले. संसर्ग दर 29.21 टक्क्यांवर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अॅक्टिव्ह प्रकरणांची संख्या 94,160 झाली आहे. 22,121 लोक या आजारातून बरे झाले आहेत. दिल्लीत 62 हजार 324 लोक होम आयसोलेशनमध्ये आहेत. 2369 रूग्ण रूग्णालयात दाखल आहेत. यापैकी 768 ऑक्सिजन सपोर्टवर तर 98 व्हेंटिलेटरवर आहेत. यापूर्वी बुधवारी 27,561 नवीन प्रकरणे नोंदवली गेली होती. तर 40 रुग्णांचा मृत्यू झाला होता. 14 हजार 957 रुग्ण बरे झाले होते.

Advertisement

देशात काल कोरोना संसर्गाची 1,94,720 नवीन प्रकरणे आल्यानंतर एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3,60,70,510 झाली आहे. त्यापैकी 4,868 प्रकरणे ओमिक्रॉन प्रकारातील आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सध्या देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 9,55,319 आहे, जी गेल्या 211 दिवसांतील सर्वाधिक आहे.

Advertisement

दरम्यान,  जगभरातील अनेक देशात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. सध्या अमेरिका, ब्रिटेन, फ्रान्स,  इटली या देशात अतिशय वेगाने रुग्णवाढ होत आहे. अमेरिकेत तर रोजच रेकॉर्ड ब्रेक संख्येने रुग्ण आढळत आहेत. एका दिवसात 13 लाखांपेक्षा रुग्ण येथे सापडत आहेत. त्यामुळे अमेरिकेतील आरोग्य यंत्रणेवरील ताण अत्यंत वाढला आहे. कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत, मात्र त्यामुळे फारसा फरक पडत नसल्याचे दिसत आहे.

Loading...
Advertisement

दिल्लीत कोरोना लसीकरण वेगाने होत आहे. राज्यात गेल्या 24 तासांत एकूण 163851 लोकांना लसीकरण करण्यात आले असून त्यापैकी 94838 जणांना पहिला डोस तर 45322 जणांना दुसरा डोस मिळाला आहे. याशिवाय, दिल्लीत 24 तासांत एकूण 23691 जणांना लस देण्यात आली, तर 15 ते 17 वर्षे वयोगटातील युवकांना 50048 मध्ये एका दिवसात लस देण्यात आली, 3 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 402345 लसी देण्यात आल्या.

Advertisement

कोरोनामुळे व्हावे लागले रुग्णालयात दाखल तर असा घ्या आयुष्मान भारत योजनेचा लाभ

Advertisement
Advertisement

Leave a Reply