Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. तर संपूर्ण आयपीएल होईल परदेशात; पहा, काय आहे BCCI चा नवा प्लान; ‘या’ दोन देशांची नावे आघाडीवर

मुंबई : देशभरात कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. आता दररोज लाखोंच्या संख्येत रुग्ण आढळून येत आहेत. या संकटाचा धोका पाहता आगामी आयपीएल स्पर्धा देशात होणार का, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनामुळे आयपीएलचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्यांना देशात आयपीएलचे आयोजन करायचे आहे, परंतु कोविड 19 मुळे अडचणी निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत बीसीसीआय दुसऱ्या प्लानवर विचार करावा लागेल. त्यामुळे कदाचित आयपीएल स्पर्धा विदेशातही आयोजित केल्या जाऊ शकतात.

Advertisement

एप्रिलआधी देशात कोरोनाचे प्रमाण कमी झाले नाही, तर बीसीसीआयला परदेशात टी-20 लीग आयोजित करणे भाग पडेल. रिपोर्ट्सनुसार, आयपीएलचा 15 वा सीझन दक्षिण आफ्रिका किंवा श्रीलंकेत आयोजित केला जाऊ शकतो. 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीमुळे दक्षिण आफ्रिकेत ही लीग आयोजित करण्यात आली होती.

Advertisement

कोरोनामुळे बीसीसीआयने रणजी ट्रॉफीसह अनेक देशांतर्गत स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत आणि याबरोबरच आयपीएल 2022 चे काय होणार अशीही चर्चा सुरू झाली आहे. कोरोनामुळे आयपीएलचा 13 वा सीझन यूएईमध्ये आयोजित केला होता. तर 2021चा अर्धा सीझनही यूएईमध्ये पार पडला. त्यामुळेच पुन्हा एकदा ही टी-20 स्पर्धा परदेशात आयोजित करावी लागण्याची शक्यता दिसत आहे.

Loading...
Advertisement

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही नेहमीच UAE वर अवलंबून राहू शकत नाही, म्हणून आम्ही आणखी पर्याय शोधण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या वेळेतील फरकही खेळाडूंसाठी चांगला आहे. भारताची वेळ दक्षिण आफ्रिकेच्या वेळेपेक्षा साडेतीन तास पुढे आहे. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेत सामना संध्याकाळी 4 वाजता सुरू झाला, तर भारतात त्यावेळी 7:30 वाजले असतील आणि क्रीडा वाहिन्यांसाठी हा प्राइम टाइम आहे.

Advertisement

बीसीसीआय दक्षिण आफ्रिकेत आयपीएल आयोजित करण्याचा विचार करत आहे कारण सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिका सुरू जात आहे, ज्यामध्ये आतापर्यंत कोणतीही समस्या दिसून आलेली नाही. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने कोरोनाची समस्या चांगल्या प्रकारे हाताळली आहे. कोरोनाचे नवीन प्रकार ओमिक्रॉन देखील दक्षिण आफ्रिकेत सापडला आहे.

Advertisement

..तर संपूर्ण आयपीएल फक्त मुंबईत होईल.. जाणून घ्या, BCCI चा नेमका काय आहे प्लान.. ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply