Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. तर राज्यात आणखी कठोर निर्बंध ? ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलाय इशारा; जाणून घ्या, काय आहे कारण

मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढतॉ चालले आहेत. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने काही निर्बंध टाकले आहेत. एक दोन दिवसात रुग्णसंख्या कमी दिसत असली तरी बेसावध राहू नका. दररोज 700 मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज पडल्यास राज्यात आधिक कठोर निर्बंध जाहीर होऊ शकतील, असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. आज मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच आवश्यक निर्देश देण्यात आले.

Advertisement

गेल्या दोन दिवसांपासून कोविड रुग्णसंख्या कमी होत आहे असे जे चित्र निर्माण होत आहे ते बरोबर नसून दैनंदिन रुग्ण वाढ वेगाने होत असून जानेवारी शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी पहिल्या आठवड्यात रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण लक्षणीय वाढेल, असे सार्वजनिक आरोग्य विभागाने सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर काळजी व्यक्त करण्यात आली.

Advertisement

राज्यात आता वैद्यकिय ऑक्सिजनचा वापर हळूहळू वाढत आहे. सध्या दररोज 400 मेट्रीक टन ऑक्सिजनचा वापर होत आहे. जर यापुढे दररोज 700 मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज पडल्यास राज्यात आधिक कठोर निर्बंध टाकावे लागतील, या गोष्टी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने लसीकरण मोहिमे वेगाने राबविण्यात यावी. तसेच अन्य नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले.

Loading...
Advertisement

मुंबई व इतर प्रमुख शहरां व्यतिरिक्त आता हळूहळू राज्याच्या ग्रामीण भागात संसर्ग वाढत आहे. आज रुग्णालयात दाखल ज्या रुग्णांनी दोन्ही लसी घेतल्या आहेत त्यांना उपचारादरम्यान ऑक्सिजनची गरज भासत नाही असे दिसते. ब्रिटेन, अमेरिका या देशांतही आता रुग्णालयांमध्ये संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. त्यामुळे बेसावध राहू नका, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Advertisement

दरम्यान, याआधी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही इशारा दिला होता. नागरिकांनी कोणत्याही भ्रमात राहू नये. लसीकरणासंदर्भात दर कमी होत आहे, तो होता कामा नये. आता लसीकरण कमी झाल्याचे दिसत आहे. लोक लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. लस उपलब्ध करण्याच्या संदर्भात मागणी आम्ही करणार आहोत. अनेक जिल्हाधिकारी यांच्याकडून मागणी होत आहे, आम्ही आता केंद्राकडे मागणी करणार आहोत, अशी माहितीही टोपे यांनी दिली.

Advertisement

अमेरिका आणि चीन कोरोनाने हैराण..! चीनमध्ये आणखी एका शहरात कठोर लॉकडाऊन; जाणून घ्या अपडेट

Advertisement
Advertisement

Leave a Reply