Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Corona Update : ‘ऑक्सिजन’ बाबत केंद्राने राज्यांना दिलेत महत्वाचे आदेश; पहा, काय म्हटलेय ‘त्या’ पत्रात

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा धोका सातत्याने वाढत चालला आहे. त्यामुळे केंद्र सरकार राज्यांना सातत्याने पत्र पाठवत आहे. आताही केंद्राने पुन्हा राज्यांना पत्र पाठवले असून महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. राज्य सरकारांनी वैद्यकीय ऑक्सिजन वेळेवर पुरविण्यासाठी सर्व तयारी करावी. सर्व राज्यांनी वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरेसा बफर स्टॉक ठेवावा, अशा सूचना केंद्राने राज्यांना दिल्या आहेत. याशिवाय रुग्णांच्या काळजीसाठी सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही केंद्र सरकारने या पत्रात म्हटले आहे. केंद्रीय स्वास्थ्य सचिवांनी हे पत्र राज्यांना पाठवले आहे.

Advertisement

केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले आहे की, राज्य सरकारांनी ऑक्सिजन थेरपीमध्ये किमान 48 तास पुरेसा वैद्यकीय ऑक्सिजनचा बफर स्टॉक ठेवावा. त्यामध्ये लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (LMO) ची उपलब्धता सुनिश्चित करणे महत्वाचे आहे. त्यानुसार राज्यांनी नियोजन करावे. देशात सध्या कोरोनाचे अतिशय वेगाने वाढत आहेत त्यामुळे राज्य सरकारांनी आधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

Advertisement

PSA प्लांट पूर्णपणे कार्यरत आहेत आणि योग्य देखभालीसाठी सर्व आवश्यक निर्णय घ्यावेत. याबरोबरच ऑक्सिजन टाक्यांचीही यादी तयार करावी. बॅकअप स्टॉक आणि ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी योग्य नियोजन केलेले असावे, असे निर्देशात नमूद केले आहे. कोरोना परिस्थिती लक्षात घेता, राज्यांमध्ये लाइफ सपोर्ट उपकरणांची उपलब्धता असावी, असे या निर्देशात म्हटले आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, याआधी आरोग्य विभागाने देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ऑक्सिजन पायाभूत सुविधांसह PSA प्लांट, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, ऑक्सिजन टँक आणि व्हेंटिलेटर परिस्थिती यांबाबत आढावा घेतला होता. सर्व ऑक्सिजन उपकरणांची कार्यक्षम स्थिती सुनिश्चित करणे ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची प्राथमिक आणि महत्त्वाची जबाबदारी आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ECRP-II निधीचा पूर्ण वापर सुनिश्चित करण्याचे आवाहन केंद्रीय स्वास्थ्य सचिव राजेश भूषण यांनी केले होते. त्यानंतर आज पुन्हा केंद्रीय स्वास्थ्य सचिवांनी राज्यांन पत्र पाठवून ऑक्सिजनचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Advertisement

.. म्हणून केंद्राने घेतलाय ऑक्सिजनचा हिशोब; राज्यांना दिल्यात महत्वाच्या सूचना; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply