नवी दिल्ली : देशात कोरोनाचे 1,68,063 नवीन रुग्ण आढळल्यानंतर संसर्गाची एकूण प्रकरणे 3,58,75,790 वर पोहोचली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, यापैकी 4,461 प्रकरणे ओमिक्रॉन प्रकारातील आहेत. लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आतापर्यंत 152.89 कोटी डोस देण्यात आले आहेत. त्याचवेळी, दिल्लीत गेल्या 24 तासात कोरोनाचे 21,259 नवीन रुग्ण आढळले आहेत.
गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 34 हजार 424 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 1281 आहे, ज्यामध्ये 499 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राजधानी मुंबईत गेल्या 24 तासात कोरोनाचे 11,647 नवे रुग्ण आढळले आहेत.
केरळमध्ये 24 तासांत कोरोनाचे 9066 रुग्ण आढळले आहेत. 2,064 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पंजाबमध्ये गेल्या 24 तासांत 4593 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. गोव्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 2,476 रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाचे 1,148 नवीन रुग्ण आढळले असून त्यापैकी 640 प्रकरणे जम्मूमधील आहेत आणि 508 प्रकरणे काश्मीरमधील आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकाळी 8 वाजता जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात 208 दिवसांनंतर उपचार घेत असलेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या 8,21,446 इतकी नोंदवली गेली. ओमिक्रॉनच्या 4,461 प्रकरणांपैकी 1,711 लोक आतापर्यंत बरे झाले आहेत किंवा परदेशात गेले आहेत. मंत्रालयाने म्हटले आहे, की संसर्गाच्या एकूण प्रकरणांपैकी 2.29 टक्के रुग्ण उपचार घेत आहेत, तर कोरोनातून बरे होण्याचा दर 96.36 टक्क्यांवर आला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 97,827 ने वाढली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, दैनिक संसर्ग दर 10.65 टक्के नोंदविला गेला आहे तर साप्ताहिक संसर्ग दर 8.85 टक्के आहे.
अमेरिका आणि चीन कोरोनाने हैराण..! चीनमध्ये आणखी एका शहरात कठोर लॉकडाऊन; जाणून घ्या अपडेट