.. तरच मिळेल रेल्वे प्रवासाची परवानगी.. कोरोनाला रोखण्यासाठी रेल्वेने घेतलाय ‘हा’ निर्णय; जाणून घ्या महत्वाची माहिती
मुंबई : सध्या देशात कोरोनाचे नवीन प्रकार ओमिक्रॉनचे प्रकरण वेगाने वाढत आहेत. हे पाहता भारतीय रेल्वेने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. गेल्या दोन वर्षांत, कोरोना विषाणूमुळे, रेल्वेने आपल्या अनेक नियमांमध्ये बदल केले होते. जे हळूहळू सामान्य केले जात होते. त्याचवेळी, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे रेल्वेने पुन्हा एकदा नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कोरोना व्हायरसने लोकांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणला आहे.
यादरम्यान मोठे नुकसानही सहन करावे लागले आहे. त्यामुळे सरकार याबाबत कठोर धोरण घेत आहे. सर्व राज्य सरकारेही आपापल्या पातळीवर निर्बंध टाकत आहेत. अनेक राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानंतर आता रेल्वेनेही एक मोठा निर्णय घेतला आहे.
देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत रेल्वेने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. वास्तविक, दक्षिण रेल्वेने लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांसाठी नवा नियम बनवला आहे. या नियमांतर्गत अशा लोकांना रेल्वेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, ज्यांनी कोरोनाची लस घेतलेली नाही. लोकल ट्रेनमध्ये नो व्हॅक्सीन नो एंट्री धोरण लागू करण्यात आले आहे.
इतकेच नाही तर एखाद्या व्यक्तीने कोरोनाचा फक्त पहिला डोस घेतला असला तरी त्यांना ट्रेनमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. दोन्ही डोस अनिवार्य आहेत. आता प्रवासाचे तिकीट काढताना प्रवाशांना लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल. ज्यांच्याकडे लसीकरणाचे प्रमाणपत्र नसेल त्यांना तिकीट दिले जाणार नाही. दक्षिण रेल्वेचा हा निर्णय पाहता हा नियम इतर ठिकाणीही लागू केला जाऊ शकतो, असे मानले जात आहे.
नॉलेज की बात : काय असते ‘सेंट्रल’ आणि ‘जंक्शन’ रेल्वे स्टेशन..? जाणून घेऊ या महत्वाची माहिती..