Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Corona Update : कोरोना रोखण्यासाठी आरोग्य विभागाचा आहे ‘हा’ प्लान; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती

जालना : राज्यात सध्या कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत चालले आहेत. जानेवारी अखेरपर्यंत सर्वाधिक रुग्णसंख्या असेल त्यानंतर मात्र रुग्णसंख्येचा आलेख कमी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. केंद्रीय आरोग्यमंत्र्याच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

Advertisement

सध्या रुग्ण वाढत असले तरी राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर कोणताही ताण नाही. जिल्हा पातळीवर होम आयसोलेशन किट तयार करण्यात येईल. तसेच कोरोना तपासणी चाचण्यांच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. सध्याच्या काळात लसीकरणाच्या वेगात वाढ करण्यावर भर देण्यात येणार आहे. राज्यात जवळपास 90 टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. 69 टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. देशभरात क्वारंटाइन कालावधी सात दिवसांचा राहणार असून यामध्ये कोणताही बदल होणार नाही, असे टोपे यांनी सांगितले.

Advertisement

देशात कोरोना व्हायरस आणि त्याचे नवीन प्रकार ओमिक्रॉनची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. देशाची राजधानी दिल्ली आणि महाराष्ट्रात रुग्ण वेगाने वाढत चालले आहेत. तसेच अन्य राज्यांतही कोरोनाने आता वेग घेतला आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये निर्बंध पुन्हा कठोर केले जात आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले होते, की आम्ही देशातील सर्व राज्यांमधील सध्याच्या आरोग्य पायाभूत सुविधा आणि तयारीचा सातत्याने आढावा घेत आहोत.

Loading...
Advertisement

जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉनला वेरिएंट ऑफ कन्सर्नच्या श्रेणीत ठेवले आहे, असे केंद्राने याआधीच्या पत्रात म्हटले होते. अनेक देशांमध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणात झालेले असूनही, कोविड-19 प्रकरणांमध्ये अतिरिक्त वाढ झाली आहे. त्यामुळेच कोरोनाच्या बाबतीत अत्यंत गांभीर्याची गरज आहे. केंद्राने म्हटले आहे की सर्व राज्यांनी तपासाला गती द्यावी आणि अधिकाधिक लोकांची तपासणी करावी आणि संसर्ग झालेल्यांना गर्दीत जाण्यापासून रोखावे, जेणेकरून संसर्गाचा वेग कमी करता येईल.

Advertisement

दरम्यान, जगभरातही कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत चालले आहेत. अमेरिका, ब्रिटेन, फ्रान्स, इटली या देशांत कोरोनाने थैमान घातले आहे. अन्य देशांतही कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत चालले आहेत. त्यामुळे या घातक आजारास रोखण्यासाठी काही देशांनी पुन्हा निर्बंध कठोर केले आहेत.

Advertisement

देशात कोरोना वेगवान..! जाणून घ्या, किती वाढलेत रुग्ण; अन्य राज्यांचे काय आहेत निर्बंध..

Advertisement
Advertisement

Leave a Reply