Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

देशात कोरोना वेगवान..! जाणून घ्या, किती वाढलेत रुग्ण; अन्य राज्यांचे काय आहेत निर्बंध..

नवी दिल्ली : कोरोना आजारावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. केवळ दोन आठवड्यांत या रुग्णांची संख्या तब्बल नऊ पटीने वाढली आहे. गेल्या महिन्याच्या 27 तारखेला देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 81 हजार होती, ती आता 7 लाख 23 हजारांच्याही पुढे गेली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांची ही संख्या 204 दिवसांतील सर्वाधिक आहे. दैनंदिन प्रकरणांमध्ये वेगाने वाढ झाल्यामुळे अॅक्टिव्ह प्रकरणे वाढत आहेत. Omicron व्हेरिएंट देखील वेगाने पसरत आहे.

Advertisement

उत्तर प्रदेश राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 8 हजार 334 नवीन रुग्ण आढळले आहेत. 335 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अॅक्टिव्ह प्रकरणांची संख्या 33,946 आहे. उत्तराखंडमधील ओमिक्रॉनचा वाढता धोका पाहता प्रशासनाने सर्व शाळा 16 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. उत्तराखंडमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1292 रुग्ण आढळले आहेत.

Advertisement

केरळमध्ये 24 तासांत कोरोनाचे 5797 रुग्ण आढळले आहे. तर ओमिक्रॉनचे 17 नवीन रुग्ण आढळले आहेत. केरळमध्ये ओमिक्रॉनची 345 प्रकरणे समोर आली आहेत.

Loading...
Advertisement

ओमिक्रॉनच्या प्रकरणांचा वाढता धोका लक्षात घेता हरियाणा सरकारने 26 जानेवारीपर्यंत सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद केली आहेत. आणि ऑनलाइन वर्गांना परवानगी दिली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी कोविड-19 च्या वाढत्या प्रकरणांमुळे रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत कर्फ्यूची घोषणा केली.

Advertisement

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी 8 वाजता अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 1,33,008 अॅक्टिव्ह प्रकरणे वाढली आहेत आणि त्यांची संख्या 7,23,619 झाली आहे. जी एकूण प्रकरणांच्या 2.03 टक्के आहे. या दरम्यान, 227 दिवसांनंतर सर्वाधिक 1,79,723 नवीन रुग्ण आढळले आहेत. याआधी गेल्या वर्षी 27 मे रोजी 1,86,364 हून अधिक प्रकरणे आढळून आली होती. देशातील दैनंदिन संसर्ग दर 13.29 टक्क्यांवर पोहोचला आहे. Omicron प्रकारातील प्रकरणांची संख्या 4,033 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा प्रकार आढळून आला आहे.

Advertisement

आता राहा तयार..! म्हणून केंद्राने राज्यांना पुन्हा केलेय सतर्क; पहा, नेमके काय म्हटले ‘त्या’ पत्रात

Advertisement
Advertisement

Leave a Reply