Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मुंबईत लोकल बंद होणार का..? ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट सांगितले; जाणून घ्या…

मुंबई : नव्या वर्षातही घातक कोरोनाने आपला मुक्काम कायम ठेवला आहे. आधी डेल्टा होता आता ओमिक्रॉनमुळे कोरोना थैमान घालत आहे. जगातील अनेक देश या आजाराने हैराण झाले आहेत. या व्हेरिएंटमुळे देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात तर कोरोनाचा वेग कमालीचा वाढला आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा सर्वाधिक फटका राजधानी मुंबई शहरास बसत आहे. या शहरात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. राज्यात अनेक जिल्ह्यातही रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंध पुन्हा कठोर करण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

मुंबईतील शाळा बंद केल्या आहेत. त्यानंतर राज्यातील विद्यापीठे आणि सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. मुंबईत कोरोनाचा प्रसार जास्त आहे. शहरात दैनंदीन रुग्णसंख्या 20 हजारांच्या पुढे गेल्यास लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही, असे वक्तव्य मुंबई मनपा आयुक्तांनी केले होते. सध्याची रुग्णवाढ पाहता मुंबईमध्ये लॉकडाऊन होणार का, अशी चर्चा सुरू आहे. मुंबईत रुग्णसंख्या वाढत असली तरी कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे लोकल रेल्वे बंद करण्याबाबत कोरोना आढावा बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Loading...
Advertisement

राज्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी लॉकडाऊनबाबत सरकारचा कोणताही विचार नाही. कारण, 90 टक्के असे रुग्ण आहेत ज्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. यातील बहुतांश रुग्ण घरीच क्वारंटाइन असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

कोरोनाच्या महत्वाच्या कामालाच खो..! ‘त्या’ 9 राज्यांना केंद्राने तातडीने धाडलेय पत्र; पहा, काय घडलाय प्रकार ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply