Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. देशात सातत्याने वाढतेय ‘ते’ घातक संकट; पहा, नेमके काय म्हटलेय ‘त्या’ अहवालात

नवी दिल्ली : देशात वायू प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस आधिक त्रासदायक ठरत आहे. राजधानी दिल्ली आणि एनसीआर प्रदेशच नव्हे तर देशातील अन्य शहरांतील हवा सुद्धा खराब होत आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या शहरांमध्ये अलीकडच्या काळात प्रदूषणात वाढ झाली आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (CSE) च्या नुकत्याच आलेल्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Advertisement

खरे तर संपूर्ण उत्तर भारतात प्रदूषणाची समस्या अत्यंत भीषण बनली आहे. वायू प्रदूषणाच्या बाबतीत    दिल्ली-एनसीआर विभागातील हवेची गुणवत्ता वर्षभरातील बहुतेक वेळा खराबच राहते. पण, अलीकडच्या काळात देशातील अन्य शहरात सुद्धा प्रदूषणाची पातळी वाढत आहे. CSE अहवालानुसार, सिंगरौली शहरात 2021 मध्ये 95 दिवस असे गेले आहेत जेव्हा हवेचा दर्जा निर्देशांक अत्यंत खराब किंवा गंभीर श्रेणीत राहिला. त्याचप्रमाणे ग्वाल्हेरमध्ये  ७२, भोपाळमध्ये 38, इंदूरमध्ये 36, जबलपूरमध्ये 49 आणि उज्जैनमध्ये 30 दिवस असे होते, की ज्यावेळी हवेची गुणवत्ता अत्यंत खराब होती.

Advertisement

हिवाळ्याच्या दिवसात सिंगरौली, कटनी, ग्वाल्हेर, जबलपूर आणि भोपाळमध्ये धुक्याचा सर्वाधिक परिणाम दिसून आला आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये प्रदूषणाबाबत फारच कमी डेटा उपलब्ध आहे. असे असतानाही या संपूर्ण भागात प्रदूषणाची समस्या वाढत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध क्षेत्रांसाठी योग्य नियोजन करण्याची गरज आहे, असल्याचे मत आता व्यक्त करण्यात येत आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, राजधानी दिल्ली शहरात प्रदूषणाची समस्या अत्यंत भीषण बनली आहे. या प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम होत आहे. प्रदूषणाची समस्या कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्याने काहीच फरक पडताना दिसत नाही. प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढत चालले आहे.

Advertisement

बाब्बो.. दिल्ली नाही तर हे शहर ठरलयं सर्वात प्रदूषित; पहा, कसे वाढलेय प्रदूषण..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply