Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाला रोखण्यासाठी जोरदार तयारी.. आजच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय; आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली माहिती

नवी दिल्ली : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. क्वारंटाइन कालावधी किती दिवसांचा असावा तसेच लॉकडाऊन जाहीर करावा की करू नये, याबाबत मोठे निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत आढावा घेतला. त्यानंतर टोपे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. आता केवळ आरटीपीसीआर चाचणी करण्याची गरज नाही तर अँटिजेन टेस्टवर आपण भर देणार आहोत. अँटिजेनच्या टेस्टमध्ये करावी लागेल. अँटिजेन टेस्ट किट खरेदी केली तर त्याचा हिशोब जिल्हा प्रशासनाला कळवला पाहिजे. अँटिजेनमध्ये किती पॉजिटिव होतात याचा रेकॉर्ड ठरवला पाहिजे. त्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत, असे टोपे यांनी सांगितले.

Advertisement

कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. रुग्णसंख्या 30 हजारापर्यंत जाऊ शकेल. त्यामुळे प्रत्येकाचा आरटीपीसीआर केल्यास ताण पडेल. दीड ते पावणे दोन लाख आरटीपीसीआर दरदिवशी करण्यात येणार आहे. अँटिजेनवर पॉजिटिव आल्यास आरटीपीआर होणार नाही. किऑस्क द्वारे अँटिजेन कराव्यात, अशा सूचनाही संबंधितांना दिल्याचे त्यांनी सांगितले. आता क्वॉरंटाइनचा कालावधी 7 दिवसांचा करण्यात आला आहे. ज्यांनी लस घेतली नाही त्यांना ज्या भाषेत समजत असेल त्यांना त्या भाषेत समजावून त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तसा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Loading...
Advertisement

केंद्र सरकारने ऑग्युमेंटेड रिस्ट्रीक्शन्स असा शब्द वापरला आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन शब्द वापरता येणार नाही. आज शंभर टक्के लॉकडाऊन लावण्याची गरज नाही. व्हायरस रोखण्यासाठी गर्दी थांबवणे गरजेचे आहे. आजच निर्बंध आणावेत असे नाही. पण तपासून निर्णय घेऊ. मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितलं.

Advertisement

युरोपात कोरोनाचे थैमान.. तरीही ‘या’ देशात लॉकडाऊनचा निर्णय घेतला नाही; जाणून घ्या, काय आहे परिस्थिती ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply