Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाचा धोका वाढतोय..! आज देशात सापडलेत ‘इतके’ कोरोना रुग्ण; राज्यातही कोरोनाचा वेग वाढला..

नवी दिल्ली : देशात कोरोना आजाराचा धोका दिवसागणिक वाढत चालला आहे. ओमिक्रॉनबरोबर कोरोना संसर्गाची प्रकरणेही वेगाने वाढत आहेत. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सकाळी 8 वाजता माहिती दिली की, गेल्या 24 तासांत 37 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. ओमिक्रॉनची प्रकरणेही सुमारे दोन हजारांवर गेली आहेत. दरम्यान, आज महाराष्ट्रात तर कोरोनाचे 18 हजारांहून अधिक तर दिल्लीत सुमारे 5 हजार 500 रुग्ण आढळले आहेत.

Advertisement

आज महाराष्ट्रात 18,466 नवीन रुग्ण आढळले आहेत. ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 653 वर पोहोचली आहे. त्यापैकी 259 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 10,860 नवे रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरात आज 1,104 कोविड रुग्ण आढळले.

Advertisement

गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनाचे 5,481 नवीन रुग्ण आढळले आहेत. येथे पॉजिटिविटी रेट 8.37 टक्के इतका आहे. उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी सांगितले की, गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे 992 नवीन रुग्ण आढळले आहेत. उत्तराखंडमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 310 नवीन रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत 111 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. केरळमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,640 नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 2,363 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला.

Loading...
Advertisement

गुजरातमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,265 रुग्ण आढळून आले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 260 नवीन रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान 22 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Advertisement

ओमिक्रॉन प्रकरणे 1,940 पर्यंत वाढली आहेत. यापैकी 766 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ओमिक्रॉनची प्रकरणे आढळून आली आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, राजस्थान, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

Advertisement

BCCI ने ही घेतलाय कोरोनाचा धसका..! आयपीएलबाबत ‘तो’ महत्वाचा निर्णय अजूनही घेतला नाही

Advertisement
Advertisement

Leave a Reply