Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

राज्यात निर्बंध वाढणार का..? ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेय महत्वाचे विधान

पुणे : राज्यात सध्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने काही निर्बंध कठोर केले आहेत. राजधानी मुंबई शहरात रुग्णवाढीचा वेग जास्त आहे, त्यामुळे येथील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता राज्यभरातही निर्बंधात वाढ होणार का, अशा चर्चा होत आहेत. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे.

Advertisement

कोरोनाबाबत मुंबईत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होणार आहे. त्यानंतर निर्बंधांबाबत निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, की निर्बंधांचा निर्णय ताबडतोब घेता येत नाही. त्यावर चर्चा होईल, मंत्री आपली मते व्यक्त करतील. आरोग्यमंत्री माहिती देतील. त्यानंतर मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा होईल. त्यानंतरच काय तो निर्णय घेतला जाईल. नागरिकांना त्रास होऊ नये या बरोबरच काळजी घेणेही गरजेचे आहे. केंद्र सरकारने निर्णय घेतला आता काय करायचे ते राज्य सरकार ठरवेल.

Advertisement

राज्यात लसीकरण व्यवस्थितपणे सुरू आहे. काही ठिकाणी लसीकरण कमी होत असल्याचेही समजले आहे. याबाबत चौकशी करुन त्या ठिकाणी आवश्यक लस पुरवठा करण्यात येत आहे. सर्वांचे लसीकरण व्हावे या उद्देशाने कार्यवाही करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

Loading...
Advertisement

दरम्यान, राज्यात सध्या कोरोनाचा वेग वाढला आहे. रुग्णांची संख्या वाढत असली तरी लॉकडाऊनचा कोणताही विचार सरकारने केलेला नाही. पण, निर्बंध आधिक कठोर करण्याबाबत निर्णय घेतले जाऊ शकतात. तसेच सध्याच्या निर्बंधांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याआधी सांगितले होते. याआधी त्यांनी ओमिक्रॉनच्या बाबतीत ऑक्सिजन गरज पडण्याची शक्यता कमी आहे. पण कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज लागू शकते. आम्ही टाकत असलेल्या निर्बंधांचा वेगळा अर्थ काढू नये, असेही त्यांनी सांगितले. जर दुपटीने रुग्णवाढ सुरुच राहिली तर आधिक कठोर निर्बंधांचा विचार होऊ शकतो. त्यामुळे लोकांनी सतर्क राहून गर्दी टाळावी, निर्बंधांचे पालन करावे, आणि सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन केले होते.

Advertisement

ओमिक्रॉनचा वेग जास्त आहे. या वेगावर वेळीच नियंत्रण ठेवले नाही तर तर रुग्णवाढीनं पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची भीतीही नाकारता येणार नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. राज्यात सध्याच्या घडीला ओमिक्रॉनचे रुग्ण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत. हा वेग वेळीच रोखण्यासाठी खबरदारीचे निर्णय घेणे गरजेचे होते. ओमिक्रॉना वेग जास्त आहे पण, भिगी बाळगण्याची गरज नसली तरी काळजी घेणे मात्र गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

बाब्बो.. कोरोनाचा जबरदस्त उद्रेक.. एकाच दिवसात तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त रुग्ण; पहा, कुठे आलेय ‘हे’ संकट ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply