Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. कोरोनाचा जबरदस्त उद्रेक.. एकाच दिवसात तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त रुग्ण; पहा, कुठे आलेय ‘हे’ संकट ?

नवी दिल्ली : अमेरिकेत कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. या देशात कोरोनाचा इतका फैलाव झाला आहे, की मागील 24 तासात तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. यूएसए टुडेच्या अहवालानुसार, आरोग्य अधिकार्‍यांनी कोरोना व्हायरसच्या मागील कोणत्याही लाटेपेक्षा तिप्पट नवीन प्रकरणे नोंदली आहेत. सोमवारी एकाच दिवसात दहा लाखांपेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली.

Advertisement

जेव्हा या आठवड्यातील आकडेवारी समोर आली, तेव्हा कोरोना विषाणूच्या संसर्गामध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित होती. परंतु असे काहीही झाले नाही. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात प्रत्येक 100 पैकी जवळपास एक अमेरिकन व्यक्ती कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले आहे.

Advertisement

जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार, आदल्या दिवसापेक्षा जवळपास 1,042,000 अधिक प्रकरणे दर्शविली आहेत. याआधी गुरुवारी विक्रमी 5,91,000 नवीन प्रकरणे नोंदवली गेली होती. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत आतापर्यंत 5.5 कोटी कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत.

Loading...
Advertisement

जगभरात कोरोना संसर्गाची प्रकरणे अचानक वाढू लागली आहेत. अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून विक्रमी प्रकरणे आढळून येत आहेत. अमेरिकेचे संसर्गजन्य रोग तज्ज्ञांनी संसर्गामुळे रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढण्याचा इशारा दिला आहे. ओमिक्रॉनला डेल्टापेक्षा कमी गंभीर मानले जात आहे. याचा अर्थ रुग्णालयात दाखल होण्याची गरज कमी असेल. परंतु ते इतर प्रकारांपेक्षा कितीतरी जास्त लोकांना संक्रमित करेल, त्या प्रमाणात रुग्णालयांमधील रुग्णांची संख्या देखील वाढेल.

Advertisement

यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) ने 25 डिसेंबरच्या आकडेवारीच्या आधारे सांगितले की, आता देशात ओमिक्रॉनचे 58.6 टक्के नवीन प्रकरणे आढळून येत आहेत. भविष्यात आणखी प्रकरणे असतील. कारण, ओमिक्रॉन डेल्टापेक्षा जास्त संसर्गजन्य आहे. शनिवारी अमेरिकेत ३,४६,८६९ नवीन रुग्ण आढळले. यापूर्वी एका दिवसात 5 लाखांहून अधिक प्रकरणे आढळून आली आहेत.

Advertisement

जगभरात कोरोना रुग्णसंख्येत वाढ.. अमेरिकेबाबत तज्ज्ञांनी दिलाय ‘हा’ इशारा, जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply