Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Corona Update : देशात दोन महिन्यांनंतर प्रथमच घडलेय ‘असे’ काही; जाणून घ्या, आज काय आहे परिस्थिती

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा धोका सातत्याने वाढत चालला आहे. जवळपास तीन महिन्यांनंतर एका दिवसात 20 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. दोन दिवसांत नवीन रुग्णांची संख्या 10 हजारांवरून 20 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. शनिवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 9,170 नवीन रुग्ण, राजधानी दिल्लीत 2,716, बंगालमध्ये 4,512 आणि गुजरातमध्ये 1,069 रुग्ण आढळले.

Advertisement

वृत्तसंस्थांच्या अहवालानुसार, शनिवारी दिल्लीत कोरोना संसर्गाची 2,716 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, जी 21 मे नंतर एका दिवसातील सर्वाधिक प्रकरणे आहेत. ही प्रकरणे एका दिवसाआधीच्या प्रकरणांपेक्षा 51 टक्के जास्त आहेत. सध्या शहरात संसर्गाचे प्रमाण 3.64 टक्क्यांवर पोहोचले आहे.

Advertisement

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाचे 9,170 नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबई शहरात कोरोनाचा वेग वाढला आहे. मुंबईत मागील 24 तासात कोरोनाचे 6347 नवे रुग्ण आढळले आहेत. मात्र, या कालावधीत 451 जण बरे होऊन घरी परतले आहेत.

Advertisement

उत्तर प्रदेश मध्ये कोरोनाचे 383 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या सहा दिवसांत रुग्णांच्या संख्येत नऊ पटीने वाढ झाली आहे. 27 डिसेंबर 2021 रोजी राज्यात 40 रुग्ण आढळले. सहा महिन्यांपूर्वी जून 2021 मध्ये इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडत होते. पश्चिम बंगालमध्ये शनिवारी एका दिवसात 4,512 नवीन रुग्ण आढळले. या दरम्यान 1,913 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी 8 वाजता अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 22,775 नवीन रुग्ण आढळले आहेत. 6 ऑक्टोबर रोजी 22,431 नवीन रुग्ण आढळले. नवीन प्रकरणांमध्ये तीव्र वाढ झाली आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, देशात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. यामध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचेही रुग्ण आहेत. या व्हेरिएंटमुळे रुग्णवाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांना आवश्यक उपाययोजना करण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारने शनिवारी पुन्हा राज्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात सरकारने राज्यांना आरोग्य सुविधा तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच रुग्णांची वाढती संख्या पाहता तात्पुरत्या स्वरुपात दवाखाने सुरू करण्यासही सांगितले आहे.

Advertisement

कोरोना अपडेट : केंद्र सरकारने राज्यांनी दिलीय महत्वाची जबाबदारी; पहा, नेमके काय म्हटलेय आरोग्य विभागाने

Advertisement

राज्यात कोरोनाचा वेग वाढला..! लॉकडाऊन होणार का..? ; पहा, काय म्हणालेत आरोग्यमंत्री राजेश टोपे

Advertisement
Advertisement

Leave a Reply