कोरोना अपडेट : केंद्र सरकारने राज्यांनी दिलीय महत्वाची जबाबदारी; पहा, नेमके काय म्हटलेय आरोग्य विभागाने
नवी दिल्ली : देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वेगाने वाढत चालले आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंट या रुग्णवाढीस कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने शनिवारी पुन्हा एकदा राज्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. राज्यांनी या काळात आरोग्याच्या पायाभूत सुविधांची त्वरीत तपासणी करावी. तसेच रुग्णालयात आवश्यक आरोग्य सेवा आणि सुविधात वाढ करावी. तसेच ऑक्सिजनची उपलब्धता तपासावी, असे या पत्रात म्हटले आहे.
जगात सध्या ओमिक्रॉन प्रकारामुळे कोविड-19 प्रकरणांमध्ये आतापर्यंत सर्वाधिक वाढ नोंदवली जात आहे. 31 डिसेंबर रोजी देशात 16 हजार 764 प्रकरणे समोर आल्यानंतर रुग्णवाढ वेगाने होताना दिसत आहे. अनेक विकसित देशांमध्ये युरोप आणि अमेरिकेत रुग्णसंख्या अतिशय वेगाने वाढत आहे.
केंद्राने सांगितले की, रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढू शकतो. हे पाहता केंद्राने राज्यांना तात्पुरती रुग्णालये बांधण्यास सांगितले आहे. राज्ये देखील सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी आवश्यक उपाययोजना करत आहेत. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी राज्यांनी विशेष टीम, कॉल सेंटर्स, कंट्रोल रूम तयार कराव्यात, असे या पत्रात म्हटले आहे. केंद्राने म्हटले आहे की, राज्यांनी राज्यातील सर्व आरोग्य सुविधांमध्ये आवश्यक सुविधा, ऑक्सिजनची उपलब्धता आणि औषधांचा बफर स्टॉक यांचा नियमितपणे आढावा घेणे आवश्यक आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी, भारतात 22 हजार 775 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट खूप वेगाने पसरत असल्याचे मानले जाते. असे असले तरी या व्हेरिएंटची तीव्रता चिंताजनक नाही कारण, बहुतेक रुग्ण हे लक्षण नसलेले आणि रुग्णालयात दाखल न होताच बरे होत आहेत.
राज्यात कोरोनाचा वेग वाढला..! लॉकडाऊन होणार का..? ; पहा, काय म्हणालेत आरोग्यमंत्री राजेश टोपे