Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

राज्यात कोरोनाचा वेग वाढला..! लॉकडाऊन होणार का..? ; पहा, काय म्हणालेत आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे कोरोनाचा धोका पुन्हा वाढत चालला आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. काही निर्बंधही जाहीर केले आहेत. त्यानंतर आता राज्यात लॉकडाऊन लागणार का, अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. या मुद्द्यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केले आहे.

Advertisement

राज्यात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत चालले आहे. दोन दिवसात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होत आहेत ही वस्तूस्थिती आहे. पण, राज्यात लॉकडाऊनचा सध्या कोणताही विचार नाही. केवळ निर्बंध आधिक कठोर करण्याबाबत सरकार काम करत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Advertisement

राज्यात सध्या कोरोनाचा वेग वाढला आहे. आजही कोरोना रुग्णांची संख्या 12 ते 15 हजारांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. डेल्टा आणि ओमिक्रॉनच्या संक्रमणाचे प्रमाण आधिक असू नये, इतकेच काळजीचे आहे. डेल्टा आणि ओमिक्रॉनचे रुग्ण यांच्यातील प्रमाण कळणे गरजेचे आहे, त्यानुसार प्रशासनाला सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी लॉकडाऊनचा कोणताही विचार सरकारने केलेला नाही. पण, निर्बंध आधिक कठोर करण्याबाबत निर्णय घेतले जाऊ शकतात. तसेच सध्याच्या निर्बंधांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Loading...
Advertisement

याआधी त्यांनी ओमिक्रॉनच्या बाबतीत ऑक्सिजन गरज पडण्याची शक्यता कमी आहे. पण कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज लागू शकते. आम्ही टाकत असलेल्या निर्बंधांचा वेगळा अर्थ काढू नये, असेही त्यांनी सांगितले. जर दुपटीने रुग्णवाढ सुरुच राहिली तर आधिक कठोर निर्बंधांचा विचार होऊ शकतो. त्यामुळे लोकांनी सतर्क राहून गर्दी टाळावी, निर्बंधांचे पालन करावे, आणि सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन केले होते.

Advertisement

ओमिक्रॉनचा वेग जास्त आहे. या वेगावर वेळीच नियंत्रण ठेवले नाही तर तर रुग्णवाढीनं पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची भीतीही नाकारता येणार नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. राज्यात सध्याच्या घडीला ओमिक्रॉनचे रुग्ण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत. हा वेग वेळीच रोखण्यासाठी खबरदारीचे निर्णय घेणे गरजेचे होते. ओमिक्रॉना वेग जास्त आहे पण, भिगी बाळगण्याची गरज नसली तरी काळजी घेणे मात्र गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

ओमिक्रॉनचा धसका..! देशातील ‘या’ गावात दहा दिवसांचा कठोर लॉकडाऊन; पहा, काय म्हटलेय आरोग्य विभागाने

Advertisement
Advertisement

Leave a Reply