Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

देशात ओमिक्रॉनचा धोका वाढला.. सरकारनेही मान्य केलेय ‘ते’ वास्तव; पहा, काय म्हटलेय सरकारने

नवी दिल्ली : देशात ओमिक्रॉन संक्रमित रुग्ण वेगाने वाढत आहेत. सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे की त्याने भारतात डेल्टा व्हेरियंटची जागा आता या नव्या व्हेरिएंटने घेतली आहे. सरकारी सूत्रांनी सांगितले की, परदेशातून आलेल्या प्रवाशांपैकी 80 टक्के प्रवासी ओमिक्रॉन संक्रमित आहे. तथापि, ही दिलासादायक बाब आहे की यापैकी एक तृतीयांश लोक असे होते की त्यांना फक्त किरकोळ लक्षणे होती. याशिवाय इतर लोकांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत.

Advertisement

देशातील 23 राज्यांमध्ये आतापर्यंत 1,300 हून अधिक ओमिक्रॉन रुग्ण आढळले आहेत. केंद्र सरकारने देशातील 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना चाचण्यात करण्यास सांगितले आहे, जेणेकरून रुग्ण सापडतील आणि आवश्यक निर्णय घेण्यास मदत करता येईल. या महिन्याच्या 2 तारखेला देशात ओमिक्रॉन प्रकाराची पहिली दोन प्रकरणे कर्नाटकात आढळून आली होती. तेव्हापासून आतापर्यंत 1 हजार 300 प्रकरणे आढळून आली आहेत.

Advertisement

आरोग्य मंत्रालय या प्रकाराबाबत मिशन मोडवर काम करत आहे आणि राज्यांसाठीही मार्गदर्शक तत्त्वे सतत जारी केली जात आहेत. दरम्यान, दिल्लीत यलो अलर्ट सुरू असून त्याअंतर्गत शाळा, महाविद्यालयांसह अनेक गोष्टी बंद करण्यात आल्या आहेत. मुंबईत 15 जानेवारीपर्यंत संध्याकाळी 5 ते पहाटे 5 पर्यंत दररोज 12 तासांचे निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, आतापर्यंत, देशातील 8 राज्यांमध्ये प्रकरणे वेगाने वाढत आहेत आणि असे दिसते आहे की ते पुन्हा एकदा कोरोना हॉटस्पॉट ठरू शकतात. त्यामुळे आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना केंद्र सरकारने या राज्यांना दिल्या आहेत. देशात आता डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉनचे संक्रमण वाढत असल्याचे सरकारने मान्य केले आहे.

Advertisement

बाब्बो… 24 तासांत देशभरात आढळले कोरोनाचे इतके नवे रुग्ण.. प्रशासन अलर्ट

Advertisement
Advertisement

Leave a Reply