Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अचानक वाढले कोरोना रुग्ण..! केंद्र सरकारने ‘त्या’ 8 राज्यांना पाठवलेय पत्र; दिलेत ‘हे’ महत्वाचे आदेश

नवी दिल्ली : कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारने 8 राज्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. केंद्राने स्पष्टपणे या राज्यांना कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर निर्णय घेण्यास सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी गुरुवारी दिल्ली, हरियाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि झारखंड या राज्यांना पत्र लिहिले. त्यांनी या राज्यांना कोरोना चाचण्यात वाढ करणे, रुग्णालय पातळीवर तयारी मजबूत करणे तसेच लसीकरण मोहिमेच्या वेगात वाढ करण्यास सांगितले आहे.

Advertisement

केंद्राचा हा इशारा अशा वेळी आला आहे जेव्हा गुरुवारी गेल्या 24 तासांत देशात 13 हजार 154 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी, भारतातील ओमिक्रॉनची प्रकरणे 961 वर पोहोचली. देशातील साप्ताहिक पॉजिटिविटी दर 0.76 टक्के आहे, जो गेल्या 46 दिवसांपासून 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

Advertisement

या 8 राज्यांमधील 14 शहरांमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये अचानक झालेली वाढ पाहता केंद्राने राज्यांना पत्र लिहून तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. मोठ्या शहरांमध्ये आणि आजूबाजूला अत्यंत संसर्गजन्य ओमिक्रॉनची प्रकरणेही वेगाने वाढत आहेत. वृत्तानुसार, केंद्राने वाढते मृत्यू टाळण्यासाठी आता निर्णय घेण्यास सांगितले आहे.

Loading...
Advertisement

दिल्ली आणि मुंबईमध्ये गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांमध्ये वेगाने वाढ झाली आहे, तर गुरुग्राम, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि अहमदाबादसह इतर शहरेही मागे नाहीत. 24 तासांच्या कालावधीत, मुंबईत बुधवारी कोरोनाच्या 2 हजार 510 रुग्णांची नोंद झाली, जी मागील दिवसाच्या तुलनेत 82 टक्क्यांनी जास्त आहे. त्याच प्रमाणात, दिल्लीत बुधवारी कोरोना व्हायरसची 923 प्रकरणे नोंदली गेली. मंगळवारपेक्षा 86 टक्के अधिक प्रकरणे आहेत.

Advertisement

दरम्यान, आता देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. नागरिकांमध्ये निष्काळजीपणा वाढला आहे. कोरोना नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे सुद्धा कोरोनात वाढ होत आहे. प्रशासनाकडून निर्बंध जारी करण्यात आले आहेत. मात्र, दुसरीकडे नागरिकांनी सुद्धा जबाबदारीचे भान ठेवत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याची गरज आहे.

Advertisement

कोरोनाचा धोका कायम..! ‘एम्स’ च्या संचालकांनी नागरिकांना दिलाय ‘हा’ महत्वाचा इशारा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply