नवी दिल्ली : देशभरात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार वेगाने वाढत चालला आहे. जगभरात अनेक देशांमध्ये या व्हेरिएंटने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक कठोर निर्बंधांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारनेही आज लसीकरणाबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी 3 जानेवारी 2022 पासून लसीकरणास सुरुवात करणार आहोत, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली. फ्रंट लाईन आरोग्य कर्माचाऱ्यांना प्रॉकॉशनरी कोरोना लसीचा डोस दिला जाईल, असंही मोदी यावेळी म्हणाले आहेत.
वर्ष संपण्याबरोबरच आता कोरोनाचा नवा व्हेरीएंट ओमिक्रॉनमुळ जगभरात संसर्ग वाढतोय. देशातही रुग्णसंख्या वाढते आहे. कुणीही घाबरु जाण्याचे काही कारण नाही, सगळ्यांनी सतर्क राहावे, काळजी घ्यावी. व्हायरस म्युटेट होत असल्यामुळे आपल्याला कोरोनाशी संघर्ष करण्याची ताकदही वाढते आहे. त्यातही गुणाकार होतो आहे.
राज्यासाठी आवश्यक बफर डोस तयार करण्यासाठी आपण सज्ज आहोत. चाचण्यांची क्षमतेत वाढ करण्याचेही प्रयत्न सुरु आहेत. लसीकरण हे कोरोना संसर्गात महत्त्वाचे काम करत आहे. लसीकरणात देशाने मोठी कामगिरी केली आहे. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची राज्ये गोवा, उत्तराखंड, हिमाचलमध्ये पहिल्या डोसचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण केले आहे. लवकरच देशात नेसल आणि डीएनए लसीनाही मान्यता मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना अजूनही कायम आहे त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहणे गरजेचे आहे. देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी, देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. सध्या जगभरात ओमिक्रॉन व्हेरिएंटची चर्चा सुरू आहे. या व्हेरिएंटबाबत अनुमान वेगवेगळे आहेत. या व्हेरिएंटवर देशातील वैज्ञानिक सुद्धा लक्ष ठेऊन आहेत. या व्हेरिएंटचा अभ्यास करत आहेत. आता जे अध्ययन देशातील संशोधकांनी केलं आहे, त्यानुसार नवे निर्णय घेण्यात आले आहेत, असे प्रधानमंत्री मोदींनी स्पष्ट केले.
ओमिक्रॉनचा धोका वाढला..! देशातील 17 राज्यांत सापडलेत ‘इतके’ रुग्ण; पहा, काय इशारा दिलाय तज्ज्ञांनी