Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ओमिक्रॉनचा धसका..! देशातील ‘या’ गावात दहा दिवसांचा कठोर लॉकडाऊन; पहा, काय म्हटलेय आरोग्य विभागाने

हैदराबाद : देशात आता ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत चालले आहेत. कोरोना आटोक्यात येत असताना या नव्या व्हेरिएंटने पुन्हा टेन्शनमध्ये वाढ केली आहे. अनेक राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. आता तेलंगाणा राज्यात तर एका गावात एकमताने दहा दिवसांचा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. होय, या गावात आखाती देशातून नुकतीच परतलेली व्यक्ती ओमिक्रॉन संक्रमित आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य अधिकार्‍यांनी त्या व्यक्तीस क्वारंटाइन केले आहे आणि त्याला हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल केले आहे.

Advertisement

आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले, की तेलंगणा राज्यातील रंजना सिरसिला जिल्ह्यातील गुडेम गावात या व्यक्तीची SARS-CoV-2 च्या ओमिक्रॉन प्रकारासाठी सकारात्मक चाचणी झाल्यानंतर 10 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने निर्णय घेतला आहे. या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील. ओमिक्रॉनचा संसर्ग वेगाने होत असल्याने ते टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ग्रामपंचायतीने म्हटले आहे.

Advertisement

आखाती देशातून परतल्यानंतर आणि ओमिक्रॉन संक्रमित आढळल्यानंतर या व्यक्तीला हैदराबादमधील तेलंगणा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च हॉस्पिटल (TIMS) मध्ये दाखल करण्यात आले आहे, जिथे त्याची प्रकृती स्थिर आहे. तेलंगणात गुरुवारपर्यंत ओमिक्रॉनची 38 प्रकरणे आढळून आली आहेत. तामिळनाडूमध्ये सुद्धा गुरुवारी ३३ प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या आता 34 झाली आहे. याप्रकरणी

Loading...
Advertisement

दरम्यान, ओमिक्रॉनचे रुग्ण युरोपीय देशात वेगाने वाढत आहेत. बुधवारी ब्रिटेनमध्ये एका दिवसात तब्बल 1 लाख 6 हजार रुग्ण आढळले होते. फ्रान्समध्येही रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. जर्मनी, पोर्तुगाल,  अमेरिका या देशांनाही ओमिक्रॉनने हैराण केले आहे. चीनमध्ये सुद्धा कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. चीनमधील शिआन प्रांतात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

ओमिक्रॉन मुळे वाढलाय धोका.. केंद्राने ‘त्या’ निवडणूक राज्यांना दिलेत ‘हे’ महत्वाचे आदेश

Advertisement
Advertisement

Leave a Reply