Take a fresh look at your lifestyle.

बापरे.. चीनमध्ये पुन्हा कोरोना..! ‘या’ मोठ्या शहरात कडक लॉकडाऊनचा निर्णय; जाणून घ्या, काय आहे खरे कारण

नवी दिल्ली : चीनमधून जगभरात फैलावलेल्या कोरोना विषाणूने पुन्हा चीनला त्रास देण्यास सुरुवात केली आहे. आता तर कोरोना नव्या रुपात थैमान घालत आहे. डेल्टानंतर ओमिक्रॉनचा धोका निर्माण झाला आहे. या व्हेरिएंटच्या विळख्यात अनेक देश अडकले आहेत. युरोप आणि आफ्रिकने देशात ओमिक्रॉनने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळे येथे अनेक देशांनी कठोर निर्बंध टाकले आहे.
दुसरीकडे चीनमध्ये सुद्धा कोरोनाचा त्रास वाढला आहे. कोरोनाची नवी लाट रोखण्यासाठी चीनने 1. 3 कोटी लोकसंख्या असलेल्या उत्तरेकडील शिआन शहरात लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत.

Advertisement

शहराबाहेर जाण्याची तातडीची गरज असल्याशिवाय घरीच राहण्याचे आदेश दिले आहेत आणि विशिष्ट परिस्थिती वगळता शहरांतील वाहतूक सुद्धा बंद केली आहे. हा आदेश लवकरच लागू होणार आहे. या आदेशात असे म्हटले आहे, की प्रत्येक घरातील एका व्यक्तीला घरगुती वापराच्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी दर दोन दिवसांनी बाहेर जाण्याची परवानगी दिली जाईल. शिआनमध्ये गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 54 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

Advertisement

काही आठवड्यांनंतर येथे हिवाळी ऑलिम्पिक सुरू होत आहेत. या स्पर्धांमध्ये काही अडचणी येऊ नयेत, यासाठी चीनने हा निर्णय घेतला आहे. खरं तर, चीनने सुरुवातीपासूनच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंधांचा अवलंब केला आहे. कोरोना प्रोटोकॉलची काटेकोर अंमलबजावणी आणि मोठ्या प्रमाणावर चाचणी, लसीकरण याद्वारे चीनला मोठ्या प्रमाणात कोरोनाचा यशस्वीपणे सामना करण्यात यश आले आहे.

Advertisement

4 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बीजिंग ऑलिम्पिकपूर्वी चीनने पुन्हा एकदा निर्बंध कठोर केले आहेत. शिआनमध्ये लॉकडाऊन हा सर्वात कडक निर्बंध आहे. 2019 मध्ये COVID-19 प्रथम आढळल्यानंतर चीनने वुहान आणि आसपासच्या परिसरात कडक लॉकडाऊन केले होते.

Advertisement

ओमिक्रॉनचा धसका..! ‘या’ देशांमध्ये पुन्हा कठोर निर्बंध; इस्त्रायलने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Advertisement

कोरोना अपडेट : ओमिक्रॉनमुळे रुग्णवाढ सुस्साट, तरीही निर्बंधांचा विचार नाही; पहा, ‘या’ देशात चाललेय तरी काय..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply