Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘ओमक्रॉन’ बाबत मिळालाय ‘हा’ इशारा; पहा, काय म्हटलेय एम्स संचालक डॉ. गुलेरिया यांनी

नवी दिल्ली : देशात अजून कोरोनाचे संकट टळलेले नाही. मात्र, कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने लोकांमध्ये पुन्हा निष्काळजीपणा आला आहे. राज्य सरकारांनी कोरोना निर्बंधात आधिक सवलती दिल्या आहेत. असे असताना आता ओमिक्रॉनचा धोका वाढत चालला आहे. देशभरात 150 पेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. ब्रिटेनमध्ये तर या व्हेरिएंटने थैमान घातले आहे. त्यामुळे या व्हेरिएंटबाबबत एम्सचे संचालक डॉ. रणदिप गुलेरिया यांनी आवाहन केले आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे, की आता आपण सुद्धा तयारी केली पाहिजे. ब्रिटनमध्ये आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तसे आपल्याकडे घडू नये असे अपेक्षित वाटते. ब्रिटेनमध्ये एका दिवसात ओमिक्रॉनचे 10 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात 90 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण या देशात आढळले आहेत. गुलेरिया म्हणाले, की जेव्हा जगात अन्य ठिकाणी कोरोना रुग्ण वाढतात तेव्हा आपण सुद्धा लक्ष ठेवले पाहिजे आणि त्यानुसार तयारी केली पाहिजे.

Advertisement

दरम्यान, ओमिक्रॉन रुग्णसंख्या वाढत असल्याने केंद्र सरकार सुद्धा अलर्ट आहे. राज्यांना कोणत्याही परिस्थितीत कोरोनावर नियंत्रण मिळवावे लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारांनी कठोरपणे कोरोना प्रोटोकॉलचे पालन करावे. गर्दीच्या ठिकाणी लोकांना दूर ठेवण्यासाठी राज्यांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.

Loading...
Advertisement

भारतात सध्या तरी कोरोना नियंत्रणात आहे. मात्र जगातील काही देश अजूनही या संकटातून बाहेर आलेले नाहीत. रशिया, चीन, युरोपातील अन्य काही देशात कोरोना पुन्हा वेगाने फैलावत चालला आहे. या देशात परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. या देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने होत असले तरी फारसा फरक पडलेला नाही. ओमिक्रॉनचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. त्याचा परिणाम म्हणून येथे रुग्णसंख्या वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

कोरोना अपडेट : आरोग्य मंत्रालयाने ओमिक्रॉनबाबत दिलाय हा इशारा, पहा, काय म्हटलेय आरोग्य विभागाने

Advertisement
Advertisement

Leave a Reply