अर्र.. ‘वर्क फ्रॉम होम’ ने आणलेत ‘हे’ आजार; ‘या’ उपायांनी अशी घ्या आरोग्याची काळजी
अहमदनगर : कोरोना काळात अनेक बदल झाले आहेत. सध्या अनेक कंपन्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. ऑनलाइन कामकाज सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे साहजिकच कॉम्प्युटर, लॅपटॉप, स्मार्टफोन या साधनांचा वापर वाढला आहे. या पद्धतीने कामकाज अगदी कमी वेळात होत आहे. मात्र, लोकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. तासनतास कॉम्प्युटर, लॅपटॉपवर काम केल्याने पाठदुखी, मानदुखीचा त्रास अनेकांना उद्भवला आहे. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या 41 टक्के लोकांना पाठीच्या मणक्याशी संबंधित आजार जडल्याचे एका अभ्यासातून दिसून आले आहे.
वर्क फ्रॉम होमच्या परिणामांबाबत पीएमसी लॅबने केलेल्या अभ्यासानुसार, 41.2 टक्के नागरिकांना पाठीच्या मणक्याचे आजार तर 23.5 टक्के नागरिकांना मानेशी संबंधित आजार जडल्याचे दिसून आले आहे. घरात सतत एकाच जागी कामासाठी बसणे, कामानंतरही एकाच जागी बसून राहणे यांसारख्या कारणांमुळे हे आजार वाढल्याचे दिसून आले.
रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार, घरातून काम करणाऱ्या प्रत्येकाने दर तासाला किमान 6 मिनिटांचा ब्रेक घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पाठीच्या मणक्यावर येणारा ताण आणि त्याचे दुष्परिणाम यांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. रोजच्या रोज चालणे आणि योगासने हा व्यायाम केला, तर वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना बहुतांश आजारांपासून दूर राहता येईल, असेही या अभ्यासात म्हटले आहे.
अयोग्य दिनचर्या, पुरेशी झोप न घेणे, आहारात पौष्टिक घटकांची कमतरता आणि तासनतास मोबाइल किंवा लॅपटॉपवर काम केल्याने डोळ्यांवर सर्वाधिक दुष्परिणाम होतो. या इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस मधून जो लाईट बाहेर पडतो तो डोळ्यांसाठी नुकसानदायक आहे. त्यामुळे डोळे दुखणे, अंधुक दिसणे, मानेत दुखणे असे त्रास होऊ शकतात.
स्क्रीन आणि आपल्यात योग्य अंतर असणे खूप महत्त्वाचे आहे. कमीत कमी एक फुटांचे अंतर असणे आवश्यक आहे. जर आपण कमी प्रकाशात कामकाज करत असाल तर कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या तीव्र प्रकाशामुळे आपले डोळे खराब होऊ शकतात. त्यामुळे योग्य प्रकाश असेल याची खात्री करणे गरजेचे आहे.
आपण काम करत असताना जास्त प्रदूषण नसेल याची काळजी घेणे आवश्यक आहे. जास्त प्रदूषण असेल तरी सुद्धा डोळ्यांना नुकसान होऊ शकते. जर आपण लॅपटॉप किंवा मोबाइलवर जास्त वेळ काम करत असाल तर डोळ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रोटेक्शन ग्लासेसचा वापर करू शकता. जेणेकरून डोळ्यांना कमीत कमी त्रास होईल.
जर आपण जास्त वेळ लॅपटॉपवर काम करत असाल तर साधारण 20 मिनिटे कामकाज केल्यानंतर काही काळ ब्रेक घ्या त्याने सुद्धा डोळ्यांची समस्या कमी होण्यास मदत मिळेल.
‘वर्क फ्रॉम होम’मुळे होतोय ‘हा’ गंभीर आजार, काय काळजी घ्याल..?
.. म्हणून कोरोना काळात ‘इतक्या’ लोकांनी ‘नाश्ता’ घेतला नाही; ‘त्या’ अहवालाने केलाय ‘हा’ खुलासा