आरोग्य मंत्र : अशी वांगी जी फायदेशीर आहेत पोट, हृदय आणि किडनीसाठी… कोणती आहेत ती वांगी?
नवी दिल्ली : वांग्याचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत आणि प्रत्येकाचे काही वेगवेगळे फायदेही आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या वांग्यांचा आहारातही समावेश व्हायला हवा.
वांग्याची भाजी लहान मुलांपासून तर प्रौढ अशा सर्वांनाच आवडते. वांग्याची भाजी करण्याचे, शिजविण्याचे वेगवेगळे प्रकारही आहेत. कोणाला सुकी तर कोणाला रस्सा असलेली भाजी आवडते. वांग्याचा उपयोग अनेक कार्यक्रमातही केला जातो.
अशा अनेक भाज्या आहेत ज्याला कदाचित चवही नसेल मात्र त्या शरीरासाठी आवश्यक असलेले अनेक घटक देतायत. वांग्याचे झाड त्यापैकी एक आहे. विशेषतः पांढरी वांगी.
पांढरी वांगी खूप फायदेशीर आहे. ज्याबद्दल आपण आज येथे जाणून घेणार आहोत. पांढरी वांगी पोटॅशियम, कॉपर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन `बी`सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे. केवळ वांगीच नाही तर त्याची पानेदेखील फायद्यांनी परिपूर्ण आहेत. चला तर मग पाहू वांगी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे.
वजन कमी करण्यासाठी प्रभावी : वर नमूद केलेल्या पोषक घटकांबरोबरच पांढऱ्या वांग्यामध्ये फायबरचे प्रमाणही चांगले असते. त्यामुळे ते खाल्ल्याने पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते. ज्याद्वारे तुम्ही अनावश्यक खाणे टाळू शकता. तसेच त्यात आढळणारे विशेष पोषक घटक रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करतात आणि चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी राखतात. त्यामुळे वजन कमी करण्याव्यतिरिक्त, पांढरी वांगी हृदयही निरोगी ठेवते.
साखरेची पातळी नियंत्रित करते : मधुमेहाच्या रुग्णांनी पांढऱ्या वांग्याचे तसेच त्याच्या पानांचे सेवन करावे. पानांमध्ये असलेले फायबर आणि मॅग्नेशियम साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात.
पचन निरोगी ठेवते : पांढरी वांगी पाचन तंत्रासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात असलेल्या फायबरमुळे तर बद्धकोष्ठता, वायू, आंबटपणाशी संबंधित सर्व समस्यांवर निकाली निघतात.
किडनीसाठीदेखील फायदेशीर : पांढरी वांगी पाने डिटोक्सिफिकेशनचे काम करतात. म्हणून जर तुम्हाला तुमची किडनी निरोगी ठेवायची असेल तर पांढरे वांगी आणि त्याची पाने तुमच्या आहाराचा एक भाग बनवा.