नवी दिल्ली : देशातील आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या टप्प्यात आज सरकारने आणखी एका महत्वाच्या निर्णयाची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डिजीटल आरोग्य मिशनचे उद्घाटन केले. या मोहिमेसाठी केंद्र सरकारने एक करार केला आहे. या अंतर्गत देशातील प्रत्येक नागरिकाकडे हेल्थ आयडी असणार आहे. हेल्थ कार्ड आधारकार्ड प्रमाणेच दिसणार आहे. तसेच या कार्डवर सुद्धा आधारकार्ड प्रमाणेच एक नंबर असणार आहे.
मागील सात वर्षांच्या काळात देशातील आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी अभियान राबवण्यात येत आहे. त्यानंतर आज आणखी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आज एका अशा अभियानास सुरुवात करण्यात आली आहे, ज्यामुळे देशातील आरोग्य सुविधांमध्ये क्रांतीकारी बदल घडवून आणण्यात येणार आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना उपचारात ज्या अडचणी येतात त्या कमी करण्याचे काम या अभियानाच्या माध्यमातून होणार आहे.
या युनिक हेल्थ आयडीमुळे रुग्णांना दवाखान्यात जाताना प्रत्येक वेळी कागदपत्रे सोबत नेण्याची गरज राहणार नाही. तसेच डॉक्टरांनाही या नंबरमुळे रुग्णांची माहिती तत्काळ मिळणार आहे. संबंधित कोणत्या सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे, याचीही माहिती समजणार आहे. या हेल्थकार्ड तयार करण्यासाठी संबंधित व्यक्तीचा मोबाइल नंबर आणि आधार नंबर घेण्यात येईल. या आधारे मोबाइल हेल्थ कार्ड तयार होणार आहे. यासाठी केंद्र सरकार एक हेल्थ अॅथॉरिटी नियुक्त करणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, या अभियानामुळे देशाच्या आरोग्य व्यवस्थेत आणखी सुधारणा होणार आहे. नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. याआधी हे अभियान देशातील सहा केंद्र शासित प्रदेशात प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आले होते. त्यानंतर आजपासून संपूर्ण देशात सुरू करण्यात आले आहे.
. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.