Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ मुळे जगभरातील मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात; पहा, नेमके काय म्हटलेय ‘त्या’ अहवालात

नवी दिल्ली : जगातील वाढत्या प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर कसे घातक परिणाम होत आहेत, हे वेगळे सांगायला नको. सध्या प्रदूषण इतक्या वेगाने वाढत चालले आहे की हा मुद्दा अवघ्या जगासाठीच काळजीचा ठरत आहे. आता तर वायू प्रदूषणाचा लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. तसा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. ब्रिटेनमधील मैनचेस्टर युनिवर्सिटी आणि डेन्मार्क येथील आर्हस युनिवर्सिटीच्या संशोधकांनी अभ्यास करुन हा अहवाल तयार केला आहे.

Advertisement

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, डेन्मार्कमधील दहा वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या सुमारे 14 लाख मुलांचा यामध्ये समावेश केला होता. या अभ्यासात असे दिसून आले, की नायट्रोजन डायऑक्साइड असणाऱ्या वातावरणात राहणारी मुले मोठी झाल्यानंतर नुकसान होऊ शकते. प्रदूषित हवेमध्ये पार्टिक्युलेट मॅटर (PM) 2.5 असलेल्या वातावरणात दीर्घकाळ राहिल्याने मानसिक समस्यांचा धोका 48 टक्के जास्त असल्याचे दिसून आले.

Advertisement

चारचाकी वाहनांद्वारे नायट्रोजन डायऑक्साइडचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होते. तर पेट्रोल आणि डिझेलद्वारे पीएम (पार्टिक्युलेट मॅटर) 2.5 चे उत्सर्जन होते. हे प्रदूषक घटक हृदय आणि फुप्फूसांच्या आजारांना कारणीभूत ठरतात. या प्रदूषकांमुळे मेंदूमध्ये जळजळ होऊ शकते, ज्यामुळे मानसिक समस्या उद्भवू शकतात, असे या संशोधकांनी सांगितले. या अभ्यासानुसार, उच्च वायू प्रदूषण असलेले वातावरण हे मुलांच्या मानसिक समस्यांशी संबंधित असल्याचे आढळून आले आहे. तसेच असे आढळून आले आहे, की वायू प्रदूषण मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकते.

Advertisement

तसे पाहिले तर, वाढते प्रदूषण मानवी आरोग्यासाठी घातकच आहे. सध्या वाढत जाणाऱ्या प्रदूषणामुळे भविष्यात काय गंभीर परिणाम होतील याची जाणीव सर्वांनाच आहे. मात्र, तरीसुद्धा प्रदूषण कमी करण्यासाठी काहीच कठोर निर्णय घेतले जात नाहीत. विकसित देशांचा यामध्ये स्वार्थ आहे. असे निर्णय घेतले गेले तर त्यांना अब्जावधींचा झटका बसू शकतो. त्यामुळे त्यांच्याकडून प्रदूषणाची समस्या दूर करण्यासाठी काहीच प्रयत्न होत नाहीत. दुसरीकडे जगभरात वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. या वाहनांद्वारेही प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply