Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पावसाळा म्हणजे अनारोग्याची भीती; पहा नेमकी काय काळजी घ्यायचीय तुम्हाला

पावसाळ्यात अनेक साथीचे आजार पसरण्याचा धोका कायमच असतो, आणि आता तर कोरोनाचा आजार आहे. पावसाळ्यात कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची भिती आहे. तिसऱ्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात रोग प्रतिकार शक्ती कमी करणारे साथीचे आजार उद्भवणे परवडणारे नाही. या काळात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. पावसाळ्यात आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

Advertisement

पावसाळ्याच्या दिवसात साथीचे आजार पसरण्याची भिती असते, हे आजार दूषित पाण्यावाटे सुद्धा पसरतात. याआधीही असे प्रकार बऱ्याचदा घडले आहेत. ग्रामीण भागात या समस्या कायमच पाहण्यास मिळतात. त्यामुळे खबरदारी म्हणून पाणी शुद्धीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. .पाणी नमुने गोळा करुन त्यांची तपासणी करुन दूषित पाणी आढळल्यास तत्काळ आवश्यक उपाययोजना करण्यासही सांगण्यात आले आहे. या काळात संक्रमण होऊ नये तसेच  आजारांपासून दूर राहता यावे, यासाठी अशा पद्धतीने खबरदारी घ्यावी…

Advertisement

पावसाळ्यात ओले कपडे शक्यतो वापरू नयेत, असे कपडे वापरल्याने त्वचेसंबंधी त्रास होऊ शकतो. तसेच फंगल इन्फेक्शनचाही धोका आहेच. पावसाळ्यात केस ओले ठेऊ नयेत, केस ओले राहिल्यास डोक्यात संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात जंक फूड तसेच बाहेरचे खाद्य पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, पावसाळ्यात बाहेरील खाद्यपदार्थ टाळावेत. बाहेरच्या खाद्य पदार्थांमुळे आरोग्याबाबत अनेक तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते.

Loading...
Advertisement

या काळात बोटांची नखे शक्यतो वाढवू नयेत. कारण, नखे वाढलेली असतील तर त्यामध्ये घाण साचून पोटात जाण्याची शक्यता असते. यामुळे देखील अनेक आजार उद्भवू शकतात. पावसाच्या दिवसात दूषित पाण्याच्या समस्या वाढतात. या पाण्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. बऱ्याचदा असे घडते सुद्धा. त्यामुळे या दिवसात स्वच्छ पाणी प्यावे, जेणेकरुन काही आजार होणार नाहीत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply