Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून देशभरात लसदुष्काळ; पहा लसटंचाईवर नेमके काय म्हटलेय सिसोदिया यांनी

दिल्ली : कोरोना लसींचा साठा लवकरच संपणार आहे, केंद्र सरकारने तत्काळ लस पुरवठा करावा, अशी मागणी दिल्ली सरकारने केल्यानंतरही वेळेवर लस मिळाल्या नाहीत. आणि आता कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा संपला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी दिली.

Advertisement

त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी मागील दोन आठवड्यात वेगाने लसीकरण करण्यात आले. आता मात्र लसींचा साठा संपला आहे आणि केंद्र सरकारकडूनही लसींचा पुरवठा देखील होत नाही. त्यामुळे केंद्र सरकारला आवाहन आहे, की सरकारने लवकरात लवकर पुरेशा प्रमाणात लस पुरवठा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Advertisement

दुसरीकडे मात्र, कोरोना काळात लसींच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात सुरू असलेला वाद अजूनही मिटलेला नाही. लसी वेळेवर मिळत नसल्याची तक्रार राज्ये करत असली तरी केंद्र सरकार मात्र आपल्या दाव्यावर ठाम आहे. आताही केंद्र सरकारने राज्यांकडे जवळपास 1.24 कोटींपेक्षा जास्त लसी उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील आठवड्यात कोरोना प्रतिबंधक लसींबाबत दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने आतापर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 32.92 कोटी लसी दिल्या आहेत. यामध्ये वाया गेलेल्या लसींचाही समावेश आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे आजही लसीकरणासाठी 1.24 कोटीपेक्षा जास्त लसींचे डोस शिल्लक आहेत. तसेच पुढील काही दिवसांत राज्यांना 94 लाख 66 हजार 420 लसींचा पुरवठा होणार आहे, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले होते. असे असले तरी राज्ये मात्र लसी नसल्याची तक्रार करत आहेत. केंद्र सरकार मान्य करण्यास तयार नाही. त्यामुळे संभ्रम वाढला आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, आता 21 जूनपासून सर्व नागरिकांच्या मोफत लसीकरणास सुरुवात झाली आहे. यासाठी केंद्र सरकार राज्यांना मोफत लस देत आहे. राज्यांनी लसीकरण सुरू केले असले तरी पुन्हा लसींच्या कमतरतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पंजाब आणि छत्तीसगड राज्यांनी याबाबत केंद्र सरकारला माहिती देत पुरेशा प्रमाणात लस पुरवठा करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे की राज्यात लसींची केमतरता असल्याचे केंद्र सरकार आजही मान्य करण्यास तयार नाही.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply