Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ आजारामुळे तब्बल हजारोंचा झालाय मृत्यू; पहा करोनासह कोणत्या संकटाशी लढतोय महाराष्ट्र

मुंबई : कोरोना पाठोपाठ देशात म्युकरमायकोसिस आजाराने थैमान घातले आहे. राज्यातही या आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे राज्य सरकारचे टेन्शन वाढले आहे. राज्यात कोरोना नंतर या आजाराचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. राज्यात आजमितीस या आजाराच्या रुग्णांची संख्या ९ हजारांपर्यंत पोहोचली आहे. तसेच या घातक आजाराने आतापर्यंत १ हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement

कोरोना संक्रमित रुग्ण मोठ्या प्रमाणात या आजाराच्या विळख्यात सापडत आहेत. हा एक गंभीर आजार असून याचा परिणाम डोळे, नाक होतो, काही वेळेस तर याचे इन्फेक्शन मेंदूपर्यंत सुद्धा पोहोचते. कोरोनामुळे रुग्णांना अनेक आरोग्य विषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे. काळ्या बुरशीची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. देशभरात या आजाराचे रुग्ण ४० हजार ८४५ पेक्षा जास्त रुग्ण आहेत. राज्यात मे महिन्यात या आजाराचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून आतापर्यंत ८ हजार ९२० रुग्ण सापडले आहेत. आता सध्या या आजाराच्या रुग्णवाढीचा वेग कमी झाला आहे.

Advertisement

म्युकरमायकोसिस प्रमाणेच व्हाइट फंगस आणि येलो फंगसचेही रुग्ण आढळले आहेत. येलो फंगस या दोन्ही आजारांपेक्षा जास्त घातक असल्याचे सांगण्यात येत आहे. देशात अद्याप कोरोना नियंत्रणात आलेला नाही. दुसऱ्या लाटेचा जोर आता बऱ्यापैकी कमी झाला आहे. रुग्णसंख्या वेगाने कमी होत आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. मात्र अजूनही धोका कायम आहे. आता तर तिसऱ्या लाटेचा इशारा मिळाला आहे. डेल्टा प्लस या घातक व्हेरिएंटचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने सुद्धा राज्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, देशात दुसऱ्या लाटेत हाहाकार उडाला होता. रुग्णवाढीचा वेग इतका जबरदस्त होता की एक दिवसात चार लाख रुग्ण सापडत होते. इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली. ऑक्सिजनचे मोठे संकट निर्माण झाले. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले. या काळात मृत्युदर सुद्धा वाढला होता, पॉझिटिव्हिटी रेट वाढला होता, अशी विदारक परिस्थिती या काळात होती. त्यामुळे तिसरी लाट आलीच तर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने नियोजन करण्यास सुरुवात केली. देशातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर भर दिला. ऑक्सिजन कमतरता दूर करण्यासाठी देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात आले. नवीन दवाखान्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. औषधे आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतील याचे नियोजन करण्यात आले, त्यामुळे आता तिसरी लाट आली तरी या लाटेचा सामना करण्यास तयार असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply