Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून चीनचा झालाय तिळपापड; पहा कशामुळे बेताल टीका केलीय ग्लोबल टाइम्सने

दिल्ली : कोरोनाच्या संकट काळात दुसऱ्या देशांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या मुद्द्यावर आता चीन आणि ऑस्ट्रेलिया या देशात चांगलाच वाद निर्माण झाला आहे. संकटग्रस्त देशास मदत केल्याचा आनंद होण्याऐवजी हे दोन्ही देश एकमेकांवर आरोप करत आहेत. तसेही सध्या चीन आणि ऑस्ट्रेलिया मध्ये काही दिवसांपासून वाद सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून आता प्रत्येक ठिकाणी या देशात वाद सुरू झाले आहेत. आताचा वाद पापुआ न्यू गिनी या देशास कोरोना लस देण्यावरुन सुरू झाला आहे.

Advertisement

चीनने या देशास कोरोना प्रतिबंधक लसी दिल्या आहेत. मात्र, या प्रकरणात ऑस्ट्रेलिया हस्तक्षेप करत असल्याचा आरोप चीनने केला आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे, की या प्रकरणी चीन आणि पापुआ न्यू गिनी या देशात असलेले सहकार्य नष्ट करण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. चीनच्या या आरोपांवर ऑस्ट्रेलियाने सुद्धा तीव्र आक्षेप घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचे मंत्री जेड सेसेल्जा यांनी चीनने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी म्हटले, की चीनने केलेल्या या आरोपांतून काहीच साध्य होणार नाही. याउलट या संकटग्रस्त देश आणि आसपासच्या देशांचीही मदत करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. चीनने मात्र ऑस्ट्रेलियाला धमकीच दिली आहे. ऑस्ट्रेलियाने चीन विरोधात कोणतीही कार्यवाही करू नये, असे म्हटले आहे.

Advertisement

तसे पाहिले तर, काही दिवसांपासून चीन आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तणाव निर्माण झाला आहे. चीनने मागील वर्षात ऑस्ट्रेलियाच्या मद्यावर तब्बल 218 टक्के टॅक्समध्ये वाढ केली होती. कोरोना विषाणूचा उगम आणि चिनी कंपनी हुवावेस 5 जी नेटवर्क बनवण्यास ऑस्ट्रेलियाने विरोध केल्यानंतर या दोन्ही देशात वाद सुरू झाले आहेत.

Loading...
Advertisement

याच कारणामुळे चीनने ऑस्ट्रेलियास त्रास देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या देशाच्या अडचणी वाढल्या आहेत. चीनला धडा शिकवण्यासाठी ऑस्ट्रेलिया जागतिक व्यापार संघटनेकडे तक्रार करणार आहे. मात्र, येथे ऑस्ट्रेलियास यश मिळेल याची शक्यता खूपच कमी आहे. कारण, चीनने जागतिक व्यापार संघटने बरोबर संबंध खूप कमी केले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या बाजूने निकाल लागण्यास बराच काळ जाण्याची शक्यता आहे. तसेच याद्वारे काही खास आर्थिक प्रभाव पडण्याची शक्यता सुद्धा कमीच आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply