Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

दही आवडते ना..? हा थंडगार पदार्थ खाण्याचे भन्नाट फायदेही माहित आहेत का?

आजच्या धावपळीच्या जमान्यात आरोग्याकडे लक्ष देणे सहसा शक्य होत नाही. आहाराच्या वेळा पाळल्या जात नाहीत. अनेकांना तर फास्ट फूड खाण्याची सवयच लागली आहे. तसेच रोजच्या आहारात मसालेदार पदार्थांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे. हे टाळण्यासाठी काही नियम पाळणे खूप महत्वाचे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आहाराकडे व्यवस्थित लक्ष देणे. तसेच निरोगी राहण्यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश असणे आवश्यक आहे.

Advertisement

आपल्या देशात दही या पदार्थाचा आहारात समावेश केला जातो. मात्र, दह्यामध्ये अनेक महत्वाचे घटक असतात. ज्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. दहीमध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियम भरपूर असतात. यामुळे आपले दात आणि हाडे मजबूत होतात. तसेच दही संधिवात प्रतिबंधित करते. दहीमध्ये लैक्टोज असते. यामुळे तुमची पाचकशक्ती वाढते. ज्यांचे पचन तंत्र कमकुवत आहे अशा लोकांसाठी ते फायदेशीर आहे, कारण दही पचणे खूप सोपे आहे.

Advertisement

दररोज दहीचे खाल्ल्यास कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि उच्च रक्तदाब कमी होण्याचा धोका देखील कमी होतो. दही आपल्या कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित ठेवते. हे तुमचे हृदय निरोगी ठेवते. दहीमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी -२, बी -१२, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतात. हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दहीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते जे कॉर्टिसॉल कमी करते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

Loading...
Advertisement

आता सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसाळ्यात पाचनशक्ती शक्यतो कमजोर असते, त्यामुळे दही खाणे फायदेशीर आहे. मात्र दही फार आंबट किंवा खूप दिवसांचे जुने दही नकोच. असे दही खाणे टाळावे. पावसाळ्यात शक्यतो दिवसाच्या वेळी दही घ्यावे. दही आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी रिकाम्या पोटी दही खाल्ल्याने पोटदुखी आणि गळचेपीचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे रिकाम्या पोटी दही घेणे टाळावे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply