Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

लसटंचाईचा फेरा सुटेना; पहा काय परिस्थिती उद्भवलीय राजधानीमध्येच

दिल्ली : केंद्र सरकार राज्यांकडे कोरोना प्रतिबंधक लसी शिल्लक असल्याचा दावा करत असले तरी राज्यात सध्या ज्या पद्धतीने लसीकरण सुरू आहे, त्यावरुन केंद्राचा हा दावा फोल ठरत आहे. आता राजधानी दिल्लीत पुन्हा लसींचा दुष्काळ निर्माण होऊ लागला आहे. दोन दिवस पुरतील इतक्याच लसी सध्या शिल्लक आहेत. त्यामुळे आता लसीकरणाचा वेग कमी करण्याचे सांगण्यात येत आहे. ज्यावेळी लसीकरण वेगाने होणे गरजेचे आहे, नेमक्या त्याच वेळी लसीकरण कमी करण्याचा विचार होत आहे. लसी वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने लस संकट निर्माण झाले आहे.

Advertisement

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार 31 जुलैपर्यंत त्यांना 15 लाख डोस मिळतील, असे केंद्राने कळवले आहे. या लसींचे डोस एकाच वेळी मिळणार नाहीत. टप्प्याटप्याने मिळणार आहेत. तर दुसरीकडे खासगी रुग्णालयांना पाच लाख डोस मिळणार आहेत. सध्याच्या परिस्थितीत दिल्लीत रोज सरासरी दीड ते दोन लाख लोकांचे लसीकरण होत आहे. या आधारावर विभागाने लसींचे गणित मांडले आहे. त्यानुसार 10 ते 15 दिवसांत 20 लाख डोस संपण्याची शक्यता आहे. म्हणजेच जुलै महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात सरकारकडे लस शिल्लक राहणार नाही. त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी लसीकरणाचा वेग कमी करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

Advertisement

कोरोनाचे भविष्यातील संकट पाहता जास्तीत जास्त लोकसंख्येचे लसीकरण करण्याचे आव्हान आहे, याच काळात लसींची कमतरता असल्याने लसीकरणातील अडचणी वाढल्या आहेत. 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिम सुरू आहे. मात्र पुरेशा लसी मिळत नसल्याने याआधी दोन वेळेस लसीकरण केंद्र बंद करावी लागली होती. आताही पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होत आहे.

Loading...
Advertisement

राजधानी दिल्लीत एकूण 18 वर्षे व त्यापेक्षा जास्त वयोगटातील जवळपास 1.59 कोटी नागरिक आहेत. या नागरिकांच्या लसीकरणासाठी कोविशिल्डच्या16.81 लाख लसी आणि कोवैक्सिनच्या 3.44 लाख लसी पुढील चार ते पाच टप्प्यात मिळणार आहेत. आतापर्यंत दिल्लीत 83,80,872 लोकांचे लसीकरण झाले आहेत. यापैकी, 64,70,693 लोकांना पहिला तर 19,10,179 लोकांना दुसरा डोस दिला आहे. कोविन वेबसाइटनुसार, रविवारी दिल्लीतील 88 केंद्रांवर लसीकरण करण्यात आले, त्यामध्ये 10 सरकारी आणि इतर 78 खासगी केंद्रांचा समावेश आहे. दरम्यान, पुरेशा प्रमाणात लस न मिळाल्यामुळे लसीकरणावर परिणाम होत आहे. 26 जून जून ते २ जुलै दरम्यान दिल्लीत सर्वाधिक 10.89 लाख लसीकरण करण्यात आले. पण गेल्या दोन दिवसांत केवळ 1.61 लाख लसीकरण करणे शक्य झाले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply