Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

योगीराज्यात सुरू आहे दुप्पट किमतीने खरेदी..! पहा कशात भ्रष्टाचार होत असल्याचा झालाय आरोप..!

दिल्ली : उत्तर प्रदेश राज्यात पुढील वर्षात निवडणुका होणार आहेत. मात्र, विरोधकांनी आतापासूनच राज्य सरकार विरोधात वातावरण तयार करण्यास सुरुवात केली आहे. समाजवादी पार्टीनंतर आता आम आदमी पार्टीने आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

कोरोना काळातील राज्य सरकारच्या कारभारावर आरोप केले जात आहेत. आताही तिसऱ्या लाटेच्या नावाखाली राज्य सरकार वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत भ्रष्टाचार करत असल्याचा घणाघाती आरोप आपचे खासदार संजय सिंह यांनी केला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात नवीन रुग्णालयांसाठी बाजारभावापेक्षा दुप्पट दराने वैद्यकीय उपकरणे खरेदी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. कोरोनाच्या नावाखाली हा घोटाळा सुरू असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

Advertisement

लहान मुलांसाठी जे व्हेंटीलेटर २२.५ लाख रुपयांना खरेदी केले जात आहे. त्याचा बाजारभाव साडे बारा लाख रुपये आहे. युनिव्हर्सल व्हेंटीलेटर १७ लाखांना खरेदी करण्यात येत आहे. मात्र, बाजारात या व्हेंटीलेटरची किंमत ९ लाख रुपये आहे. इन्फ्यूजन मशीन, पोर्टेबल एक्स रे मशीन यांसारखी वैद्यकीय उपकरणे दोन ते तीन पट जास्त दराने खरेदी केली जात आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी मार्च २०२० मध्ये युपी सरकारने २०० व्हेंटीलेटर १७ लाख रुपये दराप्रमाणे खरेदी केले. मात्र, हेच व्हेंटीलेटर मध्य प्रदेशात १० लाख २७ हजारांना मिळत आहे. आरटीपीसीआर मशीन मध्य प्रदेशात १४ लाख रुपयात मिळते. मात्र, उत्तर प्रदेशने मशीन तब्बल ४९ लाख रुपयांना खरेदी केल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, याआधी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले होते, की आज राज्यात लोकांना लसींची आवश्यकता आहे मात्र सरकार लोकांचे लसीकरण करण्यात अपयशी ठरत आहे. लसींचे नियोजन पूर्णपणे उद्धवस्त झाले आहे. सध्या केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आहे तरीसुद्धा रोजगार, कोविड 19, अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा आढावा का घेतला जात नाही, गुंतवणुकीबाबत जी आश्वासने दिली होती, त्याचे काय, गंगा नदीच्या साफसफाईचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले, असे सवाल यादव यांनी यावेळी उपस्थित केले.

Advertisement

राज्यतील जनता अजूनही स्वस्त दरात वीज पुरवठा केव्हा होईल, याची वाट पाहत आहे. या सरकारने राज्यातील दवाखान्याची अवस्था अतिशय खराब करून टाकली आहे, असा आरोप त्यांनी केला होता. भाजप सरकारच्या शासन काळात झालेल्या घोटाळ्यांमुळे विदेशात जमा असल्येल्या काळ्या पैशात वाढ झाली आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला होता. भाजप सरकारमध्ये विकासाची कामे नाहीतच. या सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्यांमुळेच विदेशात जमा असलेल्या काळ्या पैशात वाढ झाली, आणि देशाचा जीडीपी मात्र घटत गेला. जनतेचा विश्वास गमावलेल्या भाजपने आता घोटाळ्यांद्वारे कमाई करण्याचा नवा मार्ग शोधला आहे. कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचार सहन करणार नाही, असा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दावा सुध्दा पोकळ असल्याचे सिद्ध झाले आहे. राज्य सरकारच्या अनेक योजनांत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यादव यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply