Take a fresh look at your lifestyle.

पुणे जिल्ह्यातील गाव झाले १०० % लसवंत; पटोलेंनी केले आमदारांचे अभिनंदन

पुणे : देशभरात करोना लसटंचाई जोमात आहे. केंद्र सरकार उलटसुलट दावे करून आपल्या कर्तुत्वाची शेखी मिरवत असतानाच सरकारी व खासगी आरोग्य केंद्रात लस मिळण्यासाठी नागरिकांना वणवण करावी करावी लागत आहे. अशावेळी पुणे जिल्ह्यातील आमदार संजय जगताप यांनी त्यांच्या मतदारसंघातील एक संपूर्ण गाव लसवंत करून टाकले आहे.

Advertisement

Advertisement

याबाबत माहिती देताना कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सर्वांचे मोफत लसीकरण करावे अशी सूचना सोनिया व राहुल गांधी यांनी केल्यावर या सूचनेला शीर्षस्थानी मानून संजय जगताप यांनी बहिरवाडी गावाचे मोफत लसीकरण करत ‘१००% लसीकरण झालेले देशातील पहिले गाव’ हा मान पटकावला त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन.

Advertisement

पुरंदर मतदारसंघातील या गावात सर्वच नागरिकांचे लसीकरण करण्याची किमया आमदार आणि स्थानिक आरोग्य प्रशासनाने साधली आहे. त्यामुळे या गावाचे देशभरात कौतुक होत आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे याबाबत काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply